21.9 C
New Delhi
Tuesday, March 3, 2026
Homeमहाराष्ट्रभारतातील नवीन ग्रीनफिल्‍ड उत्‍पादन प्‍लांटने मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या जागतिक धोरणाला केले दृढ

भारतातील नवीन ग्रीनफिल्‍ड उत्‍पादन प्‍लांटने मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या जागतिक धोरणाला केले दृढ

पुणे, : मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सने आपले ब्रँड्स मॅनेर, फोबोहा, सिन्‍वेन्टिव्‍ह, थर्मोप्‍ले, गॅमाफ्लक्‍स आणि प्रियामस यांच्‍यासह सहयोगाने भारतात आपल्‍या नवीन ग्रीनफिल्‍ड प्‍लांटचे अधिकृतरित्‍या उद्घाटन केले आहे, ज्‍यासह आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय उत्‍पादन व सेवा उपस्थितीमध्‍ये अधिक वाढ केली आहे. हा प्‍लांट कंपनीच्‍या दीर्घकालीन धोरणाचा प्रमुख भाग आहे आणि हॉट रनर सिस्‍टम्‍समधील कंपनीच्‍या जागतिक स्‍पर्धात्‍मकतेला मोठ्या प्रमाणात प्रबळ करतो.

२० जानेवारी २०२६ रोजी इंडिया ग्रँड ओपनिंगचे आयोजन करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये पारंपारिक भारतीय उद्घाटन समारोह पार पडला. २१ जानेवारी २०२६ रोजी ग्राहकांना व सहयोगींना कस्टमर इव्‍हेण्‍टमध्‍ये आमंत्रित करण्‍यात आले, जेथे नवीन प्‍लांट आणि त्‍यामधील टेक्निकल क्षमतांबाबत माहिती देण्‍यात आली.

प्रमुख विकास बाजारपेठ म्‍हणून भारताचे महत्त्व

भारत इंजेक्‍शन मोल्डिंग उपयोजनांसाठी जगातील सर्वात मोठी आणि झपाट्याने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे. नवीन प्‍लांटसह मोल्डिंग सोल्‍यूशन्‍स या प्रदेशातील ग्राहकांच्‍या जवळ पोहोचली आहे, तसेच शाश्वत विकासासाठी प्रबळ पाया निर्माण करत आहे. या गुंतवणूकीचा वितरणासाठी लागणारा कालावधी कमी करण्‍याचा, उत्‍पादन क्षमता वाढवण्‍याचा आणि सेवा पातळ्यांमध्‍ये अधिक सुधारणा करण्‍याचा मनसुबा आहे.

हॉटर रनर सिस्‍टम्‍स आणि संबंधित मोल्डिंग तंत्रज्ञानांसाठी जागतिक बाजारपेठ कोट्यवधी डॉलर्स असण्‍याचा अंदाज आहे, जेथे मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सचा सध्‍या जागतिक स्‍तरावर १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी मार्केट शेअर आहे. भारतात, कंपनीचा ही बाजारपेठ जवळपास २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असण्‍याचा अंदाज आहे, जेथे मार्केट शेअर १५ टक्‍के ते २० टक्‍क्‍यांपर्यंत आहे, ज्‍यामधून प्रांतामधील कंपनीची प्रबळ विकास गती दिसून येते.

मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सने ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रात आपले प्रबळ स्‍थान निर्माण केले आहे. विशेषत: सिन्‍वेन्टिव्‍ह ब्रँडच्‍या माध्‍यमातून कंपनीला अचूकपणे मोल्‍ड केलेले कम्‍पोनण्‍ट्स आणि प्रगत उत्‍पादन मानकांसाठी वाढती मागणी पाहता वैद्यकीय, आरोग्‍यसेवा, एफएमसीजी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रांमध्‍ये झपाट्याने वाढ करण्‍याची संधी दिसत आहे.

जागतिक उत्‍पादन धोरणाचा भाग म्‍हणून लोकल-फॉर-लोकल

आतापर्यंत चीनमधील मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या उत्‍पादन प्‍लांट्सनी भारतातील बहुतांश बाजारपेठांच्‍या गरजांची पूर्तता केली आहे. नवीन प्‍लांट या अवलंबनाला मोठ्या प्रमाणात कमी करते, तसेच सातत्‍यपूर्ण लोकल-फॉर-लोकल दृष्टिकोन सक्षम करते. भारतातील प्‍लांट देशांतर्गत बाजारपेठेला पुरवठा करण्‍यासोबत व्‍यापक आशियाई प्रांतासह आग्‍नेय आशिया, जपान व दक्षिण कोरियामधील बाजारपेठांना देखील पुरवठा करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल. याव्‍यतिरिक्‍त चीनमधील प्‍लांट आपल्‍या देशांतर्गत बाजारपेठेला स्‍वतंत्रपणे पुरवठा करत राहिल.

मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या नेतृत्‍वामधून निदर्शनास आले की¸ भारत आता आशियासाठी (चीन वगळून) कंपनीचे प्रमुख उत्‍पादन व सेवा केंद्र बनण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यासह पुरवठा यंत्रणेची स्थिरता प्रबळ होईल आणि सीमेपलीकडून आयातींवरील अवलंबन कमी होईल.

भारतामधून मोल्डिंग सोल्‍यूशन्‍स देशांतर्गत बाजारपेठेला व आशियामधील इतर देशांना पुरवठा करते, तसेच विद्यमान ठिकाणांमध्‍ये बदल न करता जागतिक उत्‍पादन क्षमतेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे.

”भारत जगभरातील आमच्‍या विकासासामधील सर्वात महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. या नवीन प्‍लांटसह आम्‍ही वितरणाकरिता लागणारा कालावधी कमी करण्‍यााठी, उत्तम स्थिरतेसाठी आणि प्रांतामधील ग्राहकांसोबत टेक्निकल सहयोग करण्‍यासाठी स्थिती निर्माण करत आहोत, तसेच आमच्‍या जागतिक मानकांचे पालन करत आहोत,” असे मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सचे अध्‍यक्ष मार्सेलो वेंडेमियाटी म्‍हणाले.

प्‍लांटवरील सर्वसमावेशक हॉट रनर क्षमता

नवीन प्‍लांट हॉट रनर सिस्‍टम्‍सचा विकास, उत्‍पादन व पाठिंब्‍यासाठी क्षमतांची संपूर्ण श्रेणी देतो. कार्यसंचालनांच्‍या सुरूवातीपासून सिन्‍वेन्टिव्‍ह आणि थर्मोप्‍ले ब्रँड्सच्‍या सिस्‍टम्‍सचे साइटवर उत्‍पादन करण्‍यासोबत साह्य करण्‍यात आले आहे.

सध्‍या, पुण्‍यातील प्‍लांटची कंपनीच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमधील जवळपास ५० टक्‍के उत्‍पादन करण्‍याची क्षमता आहे, तसेच बाजारपेठेतील मागणी वाढण्‍यासह स्‍थानिक कार्यसंचालनांमध्‍ये अधिक वाढ होत असल्‍यामुळे संपूर्ण उत्‍पादन श्रेणी वाढवण्‍याची योजना आहे.

प्रमुख टेक्निकल क्षमता पुढीलप्रमाणे:

l डिझाइन इंजीनिअरिंग

l मोल्‍ड फ्लो विश्‍लेषण

l उपयोजनाबाबत तपासणी

l हॉट रनर सिस्‍टम्‍सची असेम्‍ब्‍ली

l विक्री-पश्चात्त सेवेसह रिपेअर सेंटर

l दर्जा व्‍यवस्‍थापन आणि प्रमुख अकाऊंट मॅनेजमेंट

या सेटअपमध्‍ये हॉट रनर मूल्‍य सखळीच्‍या सर्व प्रमुख टप्‍प्‍यांचा समावेश आहे आणि जागतिक स्‍तरावर सतत दर्जा व प्रक्रिया मानक राखले जाण्‍याची खात्री घेतली जाते.

जागतिक स्‍तरावर कनेक्‍टेड, स्‍थानिक स्‍तरावर केंद्रित

लाँचप्रसंगी प्‍लांटमध्‍ये अभियांत्रिकी, कार्यसंचालन, विक्री, विक्री-पश्चात्त सेवा आणि प्रशासन या क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांची टीम आहे. टीम्‍स युरोप, चीन व युनायटेड स्‍टेट्समधील मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या जागतिक नेटवर्कशी संपर्कात आहेत आणि त्‍यानुसार काम करत आहेत.

पुढील काही वर्षांमध्‍ये कंपनीला आपल्या उत्‍पादन विभागामधील कर्मचारी संख्या जवळपास १२० पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अभियांत्रिकी, विक्री व प्रशासकीय टीम्ससह एकूण कर्मचारी संख्या २५० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जे बाजारपेठेतील वाढीवर अवलंबून असेल. २०२६ च्या अखेरीस कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास २२० पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मोल्डिंग सोल्यूशन्सला ग्राहकांकडून आधीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, उद्घाटनानंतर ग्राहक संवाद उपक्रमाचा भाग म्हणून १२० हून अधिक कंपन्या या नवीन प्‍लांटला भेट देतील¸ अशी अपेक्षा आहे.

तसेच भारतातील स्‍थानिक टीमला प्रादेशिक बाजारपेठेतील गरजांबाबत सखोलपणे माहित आहे, ज्‍यासह त्‍वरित प्रतिसाद आणि ग्राहक-केंद्रित टेक्निकल सपोर्ट देता येत आहे.

मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सने १६,००० चौरस मीटर उत्‍पादन व कार्यालय सुविधेमध्‍ये गुंतवणूक केली, ज्‍यामध्‍ये आधुनिक मशिनरी ताफा देखील आहे.

गुंतवणूक, संशोधन व विकास आणि दीर्घकालीन विस्‍तारीकरण दृष्टिकोन

मोल्डिंग सोल्‍यूशन्‍सने आतापर्यंत पुण्‍यातील प्‍लांटमध्‍ये जवळपास ३० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक केली आहे, जेथे प्रामुख्‍याने अत्‍यंत अचूक मशिनरी, उत्‍पादन यंत्रणा आणि निश्चित उत्‍पादन पायाभूत सुविधेमध्‍ये गुंतवणूक करण्‍यात आली आहे. कंपनीला या प्‍लांटचा विस्‍तार होत असताना साइटमधील एकूण गुंतवणूक ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे.

जागतिक स्‍तरावर ग्रुप जवळपास ५ टक्‍के वार्षिक महसूल संशोधन व विकासामध्‍ये गुंतवतो, ज्‍याचे मूल्‍य प्रति वर्ष जवळपास २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. याअंतर्गत नवीन तंत्रज्ञान, उत्‍पादन नाविन्‍यता आणि प्रगत उत्‍पादन सोल्‍यूशन्‍सवर लक्ष केंद्रित केले आहे.

भविष्‍याकडे वाटचाल करत कंपनीची भारतातील उत्‍पादन, स्‍थानिक अभियांत्रिकी क्षमता आणि संशोधन व विकास उपक्रमांमध्‍ये वाढ करण्‍याची योजना आहे. कंपनीच्‍या नेतृत्‍वाने निदर्शनास आणले की¸ भारत टूलिंग व इंजेक्‍शन मोल्डिंग तंत्रज्ञानांसाठी प्रमुख जागतिक डिझाइन व उत्‍पादन केंद्र बनण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यासह आयात-केंद्रित मॉडेलवरून झपाट्याने देशांतर्गत उत्‍पादन व निर्यातींवर केंद्रित मॉडेलमध्‍ये बदल करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
21.9 ° C
21.9 °
21.9 °
14 %
4.2kmh
4 %
Tue
35 °
Wed
37 °
Thu
38 °
Fri
38 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments