31.2 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहावितरणच्या मान्सून पूर्व देखभाल;दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे पूर्णत्वाकडे

महावितरणच्या मान्सून पूर्व देखभाल;दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे पूर्णत्वाकडे

पुणे, : येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचे आगमन होत आहे. पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलामधील वीज उपकेंद्रांतील व वीजवाहिन्यांवरील यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे वेगाने सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

       पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीचे कामे प्रामुख्याने दर गुरूवारी करण्यात येत आहेत. महापारेषण व महावितरणच्या समन्वयातून ही कामे सुरु आहेत. महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे संबंधित वीजग्राहकांना पूर्वनियोजित वीज बंदाबाबत कळविण्यात येत आहे. तसेच वृत्तपत्रांमध्ये वीज बंदचे जाहिरात निवेदन प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबतच बाधित होणाऱ्या क्षेत्रात पर्यायी अन्य वीजयंत्रणेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

महापारेषण व महावितरणकडून गुरुवारी (दि. ८) नांदेड सिटी, धायरी गाव, नऱ्हे गाव, रायकर मळा, नांदेड गाव, वडगाव, देशपांडे गार्डन सोसायटी, बाजीराव रस्ता, शुक्रवार पेठ, फडतरे चौक, पेशवे पार्कचा काही भाग, कर्वेनगर, थोरात कॉलनी, आनंद निकेतन, मधुबंध कॉलनी, नवसह्याद्री सोसायटी, वसंतनगर, इंदिरा पार्क, आनंदनगर, गुजरात कॉलनी, एमआयटी कॉलेज रस्ता, रहाटणीसह खराडी व वडगाव शेरीचा काही भाग तसेच भोसरी, पिंपरी चिंचवड व तळवडे एमआयडीसी, भोसरी, देहू, मोशी, चिखलीचा काही परिसर या भागात पूर्वमाहिती देऊन वीजयंत्रणेचे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात आली.

खाजगी किंवा विविध संस्था मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील उपरी वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. त्याचा अंदाज घेऊन वीजवाहिन्यांना संभाव्य धोका असणाऱ्या झाडांच्या मोठ्या फाद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या सहाय्याने छटाई करावी. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.2 ° C
31.2 °
31.2 °
57 %
1.3kmh
95 %
Sun
33 °
Mon
32 °
Tue
38 °
Wed
34 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!