24.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeमहाराष्ट्रकेशवनगर शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आ. शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न

केशवनगर शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आ. शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न

२६ कोटींची पाच मजली अद्ययावत शाळा, १८ महिन्यांत पूर्णत्वास

पिंपरी,- – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८, चिंचवड येथील केशवनगर शाळेच्या नवीन पाच मजली इमारतीचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या वेळी आमदार जगताप यांनी, “नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत महापालिका गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक विद्यार्थी घडवते आहे, ही अभिमानास्पद बाब आहे,” असे सांगितले.

या भूमिपूजन सोहळ्यास माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, तसेच महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२६ कोटींचा खर्च | १८ महिन्यांत पूर्णत्वास | ११५० विद्यार्थ्यांची क्षमता
नवीन इमारतीसाठी महापालिकेने २६ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, पुढील १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. शाळेत एकाच सत्रात सुमारे ११५० विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.

इमारतीतील प्रमुख सुविधा:

  • प्रत्येक मजल्यावर: स्वतंत्र स्वच्छतागृहे, वर्गखोल्या
  • विशेष रूम्स: संगणक कक्ष, वाचनालय, प्रयोगशाळा, मेडिकल रूम, अ‍ॅक्टिव्हिटी रूम
  • पाचवा मजला: बहुउद्देशीय हॉल, भाषा कक्ष, पॅंट्री

राज्य शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रमात महापालिकेचा दुसरा क्रमांक
याप्रसंगी आमदार जगताप यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रमात मिळवलेल्या दुसऱ्या क्रमांकाबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
64 %
2.1kmh
40 %
Mon
32 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!