13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रसर्व्हरच्या समस्यांमुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना होतो त्रास!

सर्व्हरच्या समस्यांमुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना होतो त्रास!

रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसापासून नोंदणीविभागाचे सर्व्हर हे अत्यंत सावकाश व संतगतीने चालत आहे. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित सर्व्हरची दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा दस्त नोंदणी विभागा विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की लाखों, करोडो रुपयांचे स्टॅम्प व नोंदणी फी भरून देखील ते चलन डिफेस न झाल्यामुळे नागरिकांना ४०मिनिटात पूर्ण होणारी नोंदणीसाठी तब्बल एक दिवस अथवा दोन दिवसाचा कालावधी जात आहे. आणि हे त्रास दायक आहे. चलनाद्धारे लाखो करोडचा स्टॅम्प भरून देखील ते चलन सिस्टीम स्वीकारण्यासाठी वेळ घेत असेल व नागरिकांचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत हे कितपत योग्य आहे. अर्थात पैसे देऊन देखील फक्त मनस्तापला सामोरे जावे लागत आहे हे दुदैव म्हणावे लागेल.
नोंदणीच्या पावतीवर अद्याप दस्त सादर केल्यापासून फक्त ४० मिनिटात स्कॅन होईल अशी वेळ दिले जाते.सध्या स्कॅनिंग बंद या समस्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वेळेचा आणि त्यांच्या भावनांचा विचार करून त्वरित सर्व्हरची अडचण दूर करावी असे रोहन सुरसे पाटील म्हणाले.

दस्त नोंदणी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासुन मुद्रांक शुल्क वाढणार या भीतीने मार्चच्या 15 तारखेपासुन प्रचंड गर्दी ही नोंदणी कार्यालयामध्ये होत आहे कोटयावधींचा स्टॅम्प डुटी भरून देखील लोंकाना सुविधा तर सोडा सर्वर स्लोचा सामना करावा लागत आहे दस्त नोंदणी पासुन दस्त स्कॅनिंग पर्यंत एका दस्तास दोन तास प्रक्रिया चालत आहे तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये रेंट अँगरिमेंट हे एका ऑफिसमध्ये तीनसेहुन अधिक दस्त रोज पेंडीग आहेत परंतु नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे हे याकडे पुर्णपने दुर्लक्ष करीत आहेत ……..

रोहन सुरवसे-पाटील
सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!