पुणे : सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांचा व्होकेशनल अवॉर्डने सन्मान केला जाणार आहे.
संमेलन शनिवार, दि. 20 आणि रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. व्होकेशनल अवॉर्डचे वितरण श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक, व्याख्याते संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रांतपाल संतोष मराठे आणि संमेलन प्रमुख मधुमिता बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

वाचन संस्कृतीची निकोप वाढ व्हावी, रोटेरियन्समध्ये साहित्याची अभिरुची वाढावी आणि रसिकांना साहित्याच्या माध्यमातून निखळ आनंद घेता यावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रासह बारा सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या संमेलनात नामवंत साहित्यिक, कलावंत, अभ्यासक , विचारवंत, कवी यांचा सहभाग असणार आहे.


