पुणे – भारताच्या शूर सैन्याने मध्यरात्री २ वाजता पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर अचूक आणि जोरदार कारवाई करत काश्मीरमधील पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रखर बदला घेतला. या निर्णायक सैनिकी कारवाईनंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर, हडपसरमधील मांजरी येथील धर्मवीर आनंद दिघे चौकात, शिवसेनेच्या वतीने मिठाई वाटप करून आणि पेढे वाटून भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “ही केवळ कारवाई नाही, तर नव्या भारताचा गर्जनात्मक इशारा आहे. भारतीय सैन्य दलाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, भारतावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर हे दहापटीने दिलं जातं!”
यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अमर दादा घुले, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, उपसंघटक दीपक कुलाळ, शासन नियुक्त नगरसेवक विकी भाऊ माने, मांजरी विभाग प्रमुख अरिफजी पटेल, तसेच अक्षय तारू, शंतनु सरकार, तेजस कोटकर, केविन दोरास्वामी, प्रणव भोसले, विश्वास राजगे आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जल्लोषाच्या निमित्ताने देशभक्तीचे भावनिक वातावरण तयार झाले होते.