
पुणे – डिस्टन्स लर्निग क्षेत्रात अतिशय उत्तम पणे काम करत असलेल्या, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगला २५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्त किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित कार्यक्रमात सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगच्या रौप्य महोत्सवी लोगोचे अनावरण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता अवचट पुणतांबेकर, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ शा. ब. मुजुमदार, तसेच सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. स्वाती मुजुमदार हस्ते करण्यात आले.
डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “तंत्रज्ञान भविष्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे, आणि दुर्गम भागात मध्ये शिक्षण पोहचवण्या करीता फायदेशीर ठरणार आहे, दुर्गम भागांना जोडण्याचे काम या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे, आणि याचाच मागोवा घेऊन एक व्हर्च्युअल ग्लोबल कॅम्पस तयार करण्याचा माझा मानस होता. २००६ मध्ये मॉडेल कॉलनी मध्ये सुरु झालेले सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग हे आता एक उत्कृष्टतेचे केंद्र (सेंटर ऑफ एक्ससलॅन्स) झाले आहे. आम्ही येथे पुरविलेल्या सुविधानामुळे हे डिस्टन्स लर्निग प्रसिद्ध झाले. या प्रवासाला २५ गौरवशाली वर्ष पूर्ण झाली पण आजूनही खूप दूर जाणे बाकी आहे, आम्ही हि वाटचाहल अशीच सुरु ठेवणार आहोत. पुढील दोन वर्षात याचे ओपन युनिव्हर्सिटी मध्ये परिवर्तन करून मुलांना डिप्लोमा न देता डिग्री दिली जाईल असा माझा भविष्यासाठीचा मानस आहे”
हा २५ वर्षाचा प्रवास विकास, यश आणि शैक्षणिक उत्कृष्टता, वचनबद्धता, नवोपक्रम आणि परिवर्तनाचा वारसा ठरला. २५ वर्षाचा वारसा आणि शिक्षणाचा एक भव्य उत्सव यावेळी साजरा करण्यात आला.