33.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीतेचा अभिमान आणि देशभक्तीचा उत्साह माजवताना पिंपरी चिंचवडमध्ये भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिक, राजकीय नेते आणि माजी सैनिकांनी सहभाग घेतला व भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला.

मावळ लोकसभा खासदार श्रीरंगअप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, उमाताई खापरे, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक आणि इतर पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक आणि युवक संघटनांचे नेते उपस्थित होते. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास पुष्पअर्पण करून रॅलीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतीय सेना झिंदाबाद’ या घोषणांनी वातावरण देशभक्तीने परिपूर्ण झाले होते. ३०० फूट लांबट तिरंगा झेंड्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.

माजी सैनिक मुरलीकांत पेटकर म्हणाले, “पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिला, पण भारतीय सैन्याने त्यांना धडा शिकवला. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की, देशाच्या सुरक्षेसाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.माजी सैनिक देविदास साबळे यांनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढल्याचे सांगितले.मावळ खासदार श्रीरंगअप्पा बारणे म्हणाले, “भारतीय सैन्याच्या शौर्यावर आणि पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी नेतृत्वावर आम्हाला अभिमान आहे. या कारवाईने दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचा उत्साह पाहून आनंद झाला. देशासाठी या निर्णयाचे महत्त्व अनमोल आहे.रॅलीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रिया कच्छावा आणि भारतीय स्त्री शक्तीच्या अधिवक्ता वर्षाताई डहाळे यांनी देशभक्तीची भावना उजागर केली.भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पिंपरी चिंचवडमधील या भव्य तिरंगा रॅलीने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वितेचा आणि देशाच्या एकतेचा संदेश ठळकपणे दिला असून, नागरिकांच्या देशभक्तीमुळे भारतीय सैन्याला मोठा पाठिंबा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
58 %
3.1kmh
40 %
Fri
35 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!