36 C
New Delhi
Sunday, July 5, 2026
Homeमहाराष्ट्ररणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न

रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न


इंदापूर –
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात, राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी मतदार जनजागृती विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व तसेच जबाबदार मतदाराची भूमिका याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका ज्योत्स्ना गायकवाड यांनी केले. त्यांनी लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांची मतदानातील सहभागाची भूमिका महत्त्वाची आहे. आणि कर्तव्य म्हणून ते पार पाडले पाहिजे.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूरचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिगंबर बिरादार यांनी देशाच्या लोकशाहीला मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक सजग नागरिकांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून मतदान केले पाहिजे. तरच देशाच्या विकासासाठी योग्य असा प्रतिनिधी निवडता येईल. आरोग्यदृष्ट्या सजग नागरिक आणि लोकशाही प्रक्रियेमधील सक्रिय सहभाग यांचा परस्पर संबंध त्यांनी अधोरेखित केला.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. रवि गायकवाड यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) विषयी सविस्तर माहिती दिली. EVM ची कार्यपद्धती, मतदानाची प्रक्रिया व सुरक्षितता याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थितांना मतदार जागृती संदर्भातील प्रतिज्ञा देण्यात आली. डमी बॅलेट मशीनद्वारे नवीन मतदार विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेऊन मतदान प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याविषयी माहिती दिली. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनीही विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन मतदान करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी भूषवले.या
कार्यशाळेसाठी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग,डॉ. प्रशांत शिंदे , प्रा.गणेश मोरे, प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे, प्रा.राजेंद्र कुमार डांगे, प्रा.डॉ.विजय केसकर, प्रा.डॉ.विलास बुवा,प्रा. विनायक शिंदे तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रा. रवि गायकवाड यांनी मानले. या कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
36 ° C
36 °
36 °
44 %
2.3kmh
37 %
Sun
42 °
Mon
39 °
Tue
39 °
Wed
38 °
Thu
38 °

Most Popular

Recent Comments