पुणे,- : रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडच्या समभागात गुंतवणूकदारांना मोठी वाढीची संधी दिसत आहे. देशातील तीन प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनी – आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल आणि नुवामा – कंपनीची स्थिर व्यवसाय गती आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता लक्षात घेऊन या स्टॉकसाठी ‘खरेदी’ (बाय) रेटिंग कायम ठेवली आहे. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १,०२९.९० रुपयांवर उघडलेल्या या समभागासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १,७८६ रुपये, तर ॲक्सिस कॅपिटलने १,७८० रुपये आणि नुवामाने १,३७६ रुपयांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्य किमतींमुळे सिग्नेचर ग्लोबलच्या स्टॉकमध्ये ७५% पर्यंत वाढ होण्याची शक्यता दिसून येते.
सिग्नेचर ग्लोबलने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ४६.६ अब्ज रुपयांची पूर्व विक्री नोंदवली असून १२.० अब्ज रुपयांचा महसूल नोंदवला आहे. कंपनीची एकूण वसुली १८.७ अब्ज रुपयांची इतकी आहे. ब्रोकरेज फर्म्सच्या मते, कंपनीच्या यशाचा मोठा आधार म्हणजे परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माण विभागात आर्थिक वर्ष २१ ते २५ दरम्यान नोंदवलेला ५७% चा मजबूत सीएजीआर (वार्षिक एकत्रित वृद्धिदर) विक्री बुकिंग आहे. गुरुग्राममधील उच्च-मूल्याच्या प्रकल्पांमध्ये बांधकाम पूर्ण होत असल्याने, आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या सहामाहीत वसुलीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कंपनीचे आर्थिक गणित अधिक मजबूत होईल.
कंपनीच्या विक्री बुकिंगमध्ये सातत्य राखण्यासाठी सिग्नेचर ग्लोबलकडे ४५० अब्ज रुपयांपेक्षा अधिक एकत्रित सकल विकास मूल्याची (जीडीव्ही) मोठी लाँच पाइपलाइन सज्ज आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा अंदाज आहे की कंपनीची विक्री बुकिंग आर्थिक वर्ष २८ पर्यंत १३९ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल. ॲक्सिस कॅपिटलने विश्वास व्यक्त केला आहे की, येत्या सहामाहीत नियोजित १३० अब्ज रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या लाँचमुळे कंपनी आपले लक्ष्य सहज साध्य करेल. नुवामाने नमूद केले आहे की, सिग्नेचर ग्लोबल गुरुग्राम मार्केटमध्ये एक अग्रगण्य डेव्हलपर म्हणून उदयास आली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे विक्री किमतीच्या केवळ १०-१५% इतक्या आकर्षक दरात जमीन मिळवण्याचे तिचे धोरण आहे. या सर्व सकारात्मक घटकांमुळे सिग्नेचर ग्लोबलमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, असा विश्लेषकांचा निष्कर्ष आहे.


