पुणे – प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनने(पेरा) पेरा सीईटीच्या (PERA CET 2024) पहिल्या फेरी चा निकाल नुकताच जाहीर केला. १५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामुळे त्यांना अभियांत्रिकी, जैव अभियांत्रिकी, सागरी अभियांत्रिकी, डिझाइन, फाइन आर्ट, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, कायदा आणि हॉटेल व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास मदत होणार आहे.
पेरा इंडिया ही महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांची संघटना आहे. गेल्या सात वर्षांपासून पेरा सीईटी परीक्षेचा आतापर्यंत 300,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळाले आणि शीर्ष सदस्य विद्यापीठांद्वारे देऊ केलेल्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला. अनेक विद्यार्थ्यांना खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घ्यायचे असल्याने, पेरा सीईटी सामायिक प्रवेश चाचणी २०२४ ची दुसरी फेरी २८-२९ जून 2024 रोजी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना आणखी एक संधी याद्वारे देण्यात येत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना ही संधी घ्यायची आहे त्यांनी अधिक माहितीसाठी आणि दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी त्यांच्या www.peraindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि आपला अर्ज २० जून पूर्वी सादर करावा. पेरा सीईटी २०२४ ची दुसऱ्या फेरी मध्ये सामील व्हावे. ही संधी त्यांना महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांद्वारे दिल्या जाणाऱ्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करण्यास मदत करणार आहे.
पेरा सीईटी २०२४ पहिल्या फेरीचे निकाल जाहीर
दुसऱ्या फेरीस २८-२९ जूनपासून सुरूवात
RELATED ARTICLES
New Delhi
mist
13.1
°
C
13.1
°
13.1
°
76 %
0kmh
0 %
Wed
19
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°


