मुंबई – देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तयारी सुरु असताना मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आयएएस अधिकारी विकास आणि राधिक रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली. मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये हे आयएएस दाम्पत्य राहतं. रस्तोगी दाम्पत्याच्या मुलीने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत.
लिपी रस्तोगी असं या मुलीचं नाव असून ती २६ वर्षांची आहे. विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा मंत्रालय परिसरात चर्चा आहे.
आयएएस दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयामोरच्या बिल्डिंगवरुन उडी
RELATED ARTICLES
New Delhi
mist
13.1
°
C
13.1
°
13.1
°
76 %
0kmh
0 %
Wed
19
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°


