पुणे- युगप्रवर्तक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखिल भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, अधिष्ठाता प्रा. डॉ.प्रभाकर देसाई, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूकर, डॉ. संदीप पालवे, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, श्री. मुकूंद पांडे, अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
New Delhi
broken clouds
32
°
C
32
°
32
°
59 %
4.3kmh
82 %
Tue
31
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
32
°
Sat
32
°