पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दत्तमंदिरात शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. गुढीचे पूजन ट्रस्टच्या खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांच्या हस्ते झाले. (dagadushet mandir)
याप्रसंगी मंदिराचे व्यवस्थापक विलास मुथा, विश्वस्त युवराज गाडवे, महेंद्र पिसाळ, ॲड. शिवराज कदम जहागिरदार, ॲड. रजनी उकरंडे, पुरुषोत्तम वैद्य गुरूजी व राहुल गरड आदी उपस्थित होते. विश्वस्त महेंद्र पिसाळ यांनी उपस्थितांना उद्बोधन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये सर्वसामान्य रयतेला सोबत घेऊन रयतेचे राज्य म्हणजेच स्वराज्य कसे स्थापन केले, याची माहिती दिली. तसेच शिछत्रपतींची राज्यनिती आजही कशी आदर्शवत आहे हे सांगितले. गुढी उभारल्यानंतर उपस्थित भाविकांना पेढे व मसालेभाताचे वाटप करण्यात आले.