36.7 C
New Delhi
Tuesday, June 3, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात पावसाची जोरदार बॅटींग

पुण्यात पावसाची जोरदार बॅटींग

मान्सून आला रे आला...!


पुणे-उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी पावसाने खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहर आणि परिसरात  ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र अंधारुन आले होते. काल सायंकाळी पाऊस चांगलाच बरसत होता.  पुणे शहरातील पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. तसेच वारजे माळवाडी, कोथरुड या भागांसह घोरपडी, लोहगाव इथं पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याचबरोबर सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, ९ ते १४ जून या काळात ढगाळ वातावरण राहणार असून साधारण पाऊस असणार आहे. यांपैकी आज ९ जूनला ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानंतर १२ ते १४ या तीन दिवसांच्या काळात दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस बरसू शकतो असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
36.7 ° C
36.7 °
36.7 °
29 %
2kmh
25 %
Tue
40 °
Wed
38 °
Thu
39 °
Fri
42 °
Sat
44 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!