23.1 C
New Delhi
Friday, November 28, 2025
Homeमहाराष्ट्रगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती

पुणे : आरक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने  शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील दोनशेहून अधिक 10 वी आणि  12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्वोत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार-२०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.   

सम्यक विहार व विकास केंद्र, भाऊ पाटील रोड बोपोडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, उपमहापौर सुनीता वाडेकर उपस्थित होते, व्हिएतनाम येथील भंते थान यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिवाजी नगर मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रस्ताविकपर भाषणात बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले,  शाहू महाराजांची जयंती एक वेगळ्या पद्धतीने आम्ही दरवर्षी साजरी करत आसतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी जयंती करण्यापेक्षा राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी सारखी साजरी करा आणि तीच आम्ही एक वेगळ्या उपक्रमातून दरवर्षी साजरी करण्याचा प्रयत्न करत असतो या निमित्त उत्कृष्ट विद्यार्थ्यांना शाहू महाराज सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करीत असतो. या भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहान देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ समिंदर घोक्षे आणि अविनाश कदम यांनी केले. आभार उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
40 %
1kmh
40 %
Fri
25 °
Sat
26 °
Sun
26 °
Mon
25 °
Tue
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!