महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान आयोजित आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी देण्यात येणार तिसरा “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024” जेष्ठ शास्त्रज्ञ् पद्मविभूषण डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर यांना आणि “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती 2024” श्री. प्रदीप संजय पाटील, इतिहास अभ्यासक (सातारा) यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, 11 ऑगस्ट 2024 रोजी सिम्बॉयसिस विश्वभवन सभागृह, सेनापती बापट रोड, पुणे येथे सकाळी 11:00 वाजता पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला श्री. गो. ब. देगलूरकर, मा. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय मंत्री), मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील (महाराष्ट्र राज्य मंत्री), श्री. प्रदीपदादा रावत आणि श्री. अमृतराव पुरंदरे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024” या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपयाचा धनादेश तसेच “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती 2024” या शिष्यवृत्तीचे स्वरूप असेल प्रशस्तिपत्रक आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश असणार आहे. कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असेल.