4.1 C
New Delhi
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्रआकुर्डीतील 'जय गणेश व्हिजन ए विंग सोसायटीच्या चेअरमनपदी दीपक मोढवे पाटील

आकुर्डीतील ‘जय गणेश व्हिजन ए विंग सोसायटीच्या चेअरमनपदी दीपक मोढवे पाटील

'सोसायटीच्या उत्कर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार' - दीपक मोढवे - पाटील

पिंपरी- आकुर्डीतील जय गणेश व्हिजन या प्रशस्त आणि प्रतिष्ठीत हाउसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे – पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने त्यांच्या चेअरमनपदी नियुक्तीचा ठराव संमत करण्यात आला. सोसायटीच्या सचिवपदी उमेश नामदे तर खजिनदारपदी बाबासाहेब बांगर यांची निवड झाली आहे.जय गणेश व्हिजन ए विंग प्रिमायसेस को-ऑप सोसायटीच्या नवीन व्यवस्थापकीय समितीच्या सभासदपदी अ‍ॅड. सरला निकाळे, संतोष काशीद, प्रदीप अग्रवाल, रवींद्र चौधरी, शांतीलाल आगरवाल, संतोष सुतार, बापूराव चोपडे, शैलेंद्र गायकवाड, मीना ठाकूर, सालार शहाबादी यांच्याही बिनविरोध निवडी झालेल्या आहेत. यावेळी सोसायटीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित चेअरमन दीपक मोढवे – पाटील यांनी निवडीबद्दल उपस्थितांचे आभार मानले. तसेच सोसायटीतील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही दिली. सोसायटीच्या उत्कर्षासाठी कायम प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी सोसायटीतील सभासदांना दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
4.1 ° C
4.1 °
4.1 °
100 %
2.6kmh
100 %
Thu
21 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!