15.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात 'कर्मवीर सप्ताह' आरंभ !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात ‘कर्मवीर सप्ताह’ आरंभ !

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त 'कर्मवीर चित्ररथ मिरवणूक'!

 औंध,   : रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आज पासून ‘कर्मवीर सप्ताह’चे आयोजन करण्यात आले. या सप्ताह मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी महाविद्यालयात प्राचार्य अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनात भव्य अशी ‘कर्मवीर चित्ररथ मिरवणूक’ काढण्यात आली. कर्मवीर सप्ताहाची सुरुवात ढोल-ताशाच्या गजरात, मुलींच्या लेझीम सह करण्यात आली.

बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथे कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्मवीर सप्ताहाची सुरुवात आज सकाळी ७ वाजता कर्मवीर चित्ररथ मिरवणूक सोहळ्यांनी झाली.  सदरची मिरवणुक महाविद्यालयापासून विठ्ठल मंदिर चौक – शेळके पथ रोड – हनुमान मंदिर चौक – श्री. पवार पथ रोड – गोवळकर गुरुजी शाळा – सरकारी हॉस्पिटल कॉर्नर- गुरुद्वारा मंदिर रोड – मलिंग  चौक आणि नंतर महाविद्यालय या मार्गे झाली.

या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सदर मिरवणुकीत सहभाग घेतला. याप्रसंगी “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद”, “रयत शिक्षण संस्थेचा विजय असो,” “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विजय असो,” “एक-दोन तीन-चार कर्मवीरांचा जयजयकार,” “ज्ञानाची मशाल हाती घेऊ, कर्मवीरांची शिकवण जगभर नेऊ,” अशा घोषणा विद्यार्थ्यांच्या वतीने दिल्या. सदर मिरवणुकीत प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला. यांनतर मिरवणुकीनंतर महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रभंजन चव्हाण, इतिहास विभाग प्रमुख राजेंद्र रास्कर, प्रा. स्वाती चव्हाण, प्रा. कल्पना कांबळे, प्रा. नेहा भडोळे, प्रा. कल्याणी सोनवणे, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. सागर कांबळे, प्रा. सौरभ कदम, विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी खवले यांच्या सह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य अरुण आंधळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!