32 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रआदित्य बिरला ग्रुपच्या इंद्रिया’चे पुण्यातील पहिले दालन सुरू

आदित्य बिरला ग्रुपच्या इंद्रिया’चे पुण्यातील पहिले दालन सुरू

पुणे: आदित्य बिरला समुहाच्या दागिन्यांच्या ब्रँड इंद्रिया’ने पुण्यात आपले पहिले दालन उघडले आहे. जुलै महिन्यात लॉन्च झालेल्या या समूहाने एकूण आठ दालने उघडली आहेत – दिल्लीत तीन, इंदूर, अहमदाबाद, पुणे, मुंबई आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक. पुण्यातील बंड गार्डन येथील नवीन दुकानासह, समूह आपल्या मजबूत ब्रँड इक्विटी आणि बाजारपेठेतील सखोल अंतर्दृष्टीचा लाभ घेत, त्याच्या ग्राहक पोर्टफोलिओला आणखी बळकट करत आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे शहर दागिन्यांच्या बाजारपेठेसह भरभराटीला येणारे आर्थिक केंद्र आहे. इंद्रियासाठी, हे शहर फॅशनने प्रेरित आणि वैविध्यसंपन्न आवड असलेल्या ग्राहकांशी संलग्न होण्याची एक अनोखी संधी देते. महाराष्ट्राची परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेले पुणे उत्कृष्ट हस्तकला प्रदर्शनासाठी एक आदर्श वातावरण प्रदान करते. आपल्या समृद्ध वारशामुळे आणि तरुण, गतिमान लोकसंख्येमुळे, पुणे हे शहर इंद्रियासाठी चोखंदळ वर्गाला मोठ्या संख्येने आकर्षित करून रचना आणि नवकल्पना या दोन्हींच्या शोधात असलेल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी एक रोमांचक क्षितिज सादर करते.

आदित्य बिरला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिरला यांनी पुढील पाच वर्षांत भारतातील पहिल्या तीन दागिन्यांच्या रिटेल विक्रेत्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या उद्देशाने जुलैमध्ये इंद्रियाची सुरुवात केली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या अभूतपूर्व गुंतवणुकीचा पाठिंबा आहे, जो भारतातील दागिन्यांच्या रिटेल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या आदित्य बिरला समूहाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.

‘इंद्रिया’ या ब्रँड नावाचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे. ही भाषा समृद्ध भारतीय संस्कृतीचे दुसरा स्वरूप आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, इंद्रिया म्हणजे शक्ती; पाच इंद्रियांची ताकद, आपल्या चेतनेला चालना देणारी इंद्रिये, आपल्याला सभोवतालच्या जगाचा अनुभव घेण्यास आणि अन्वेषण करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या अस्तित्वाची व्याख्या करतात! सुंदर ब्रँड चिन्ह म्हणून इंद्रियाने मादी चिंकारा हरणाची निवड केली आहे. हा प्राणी इंद्रियांचे रूपक असून स्त्रीचे सौंदर्य आणि शालिनतेचे प्रतीक आहे. ब्रँड अनुभव तुमच्या इंद्रियांना एकापेक्षा जास्त मार्गांनी गुंतवून ठेवेल आणि तुमचे हृदय ‘दिल अभी भरा नहीं’ गुणगुणायला प्रवृत्त होईल!

मायेने तयार केलेला प्रत्येक अलंकार सोने, पोल्का आणि हिऱ्यांच्या 16000 हून अधिक नवीन डिझाईनसह भारतीय शिल्पकलेची भावना प्रतिबिंबित करतो.

इंद्रियाचे संचालक दिलीप गौर म्हणाले की, “आम्ही इंद्रियाच्या माध्यमातून दागिन्यांच्या क्षेत्रातील सर्जनशीलता, प्रमाण, तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अनुभवातील मानकांची पुन्हा व्याख्या करण्यास तयार आहोत. दागिन्यांचा प्रत्येक नमुना हस्तकलेची एक अनोखी कथा सांगतो या समजुतीवर घडविण्यात आला आहे. विशिष्ट उत्पादन, अपवादात्मक ग्राहक अनुभव आणि तल्लख खरेदीचा प्रवास हे शेवटी दागिन्यांद्वारे आत्म-अभिव्यक्तीला सक्षम करतात. आमचे उत्पादन कालातीत हस्तकलेचे मिश्रण आहे. आपली प्रादेशिक निवड अद्वितीयता साजरी करते, तसेच या निवडीत इतर संस्कृतींच्या शोधाची सज्जता दिसते”.

इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, “दागिने ही एक श्रेणी म्हणून केवळ गुंतवणुकीपासून एका स्टेटमेंटपर्यंतचे परिवर्तन करत आहेत. आमचा प्रस्ताव समजण्याजोगा फरक, विशिष्ट रचना, वैयक्तिकृत सेवा आणि अस्सल प्रादेशिक बारकावे यावर आधारित आहे. इंद्रियाच्या प्रस्तावाच्या केंद्रस्थानी विशेष लाउंजसह नाविन्यपूर्ण सिग्नेचर अनुभव आहे. इन-स्टोअर स्टायलिस्ट आणि तज्ज्ञ दागिन्यांच्या सल्लागारांसह सानुकूलन सेवा सर्व पाचही इंद्रियांना चालना देणे आणि एक अतुलनीय खरेदी प्रवास तयार करण्याचे वचन देतात. आमच्या श्रेणीतील सर्वोत्तम डिजिटल फ्रंट एंडमुळे डिजिटल आणि फिजिकल टचपॉईंटवर अखंड अनुभव निर्माण होईल. त्याचप्रमाणे दागिन्यांच्या किरकोळ व्यापारात नवीन युगाची सुरुवात होईल.”

इंद्रिया दालन स्वतःच्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो एक स्टुडिओ असू शकतो, जिथे वैयक्तिक स्टायलिस्ट तुमच्यासाठी खास वस्तू तयार करतो, तो भारतीय शिल्पकलेचा उत्सव असू शकतो, भावी वधूसाठी एक कलाप्रकार असू शकतो, जिथे ती विविध प्रकारच्या उत्कृष्ट डिझाईनमधून पसंतीचे अलंकार शोधू शकते.

या, संपूर्ण शहराचे हृदय कुठे गुंतले आहे ते पहा. आदित्य बिरला ग्रुपचा हॉलमार्क आहे विश्वासाचा अतूट धागा.. पुण्यातील पहिल्या इंद्रिया दालनाच्या साथीने उत्कृष्ट दागिन्यांचे विश्व अनुभवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
32 ° C
32 °
32 °
59 %
4.3kmh
82 %
Tue
31 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
32 °
Sat
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!