12.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रनवी सांगवी परिसरात शंकर जगताप यांचा भेटीगाठी आणि बैठकांचा धडाका

नवी सांगवी परिसरात शंकर जगताप यांचा भेटीगाठी आणि बैठकांचा धडाका



औक्षण आणि फुलांचा वर्षाव करत नागरिकांकडून जगताप यांचे जंगी स्वागत

‘डोअर टू डोअर’ जाऊन जगताप यांनी साधला नागरिकांशी संवाद

सांगवी : – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी उमेदवारी जाहीर होताच नवी सांगवी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जगताप यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतला.

यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक शैलेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, सूर्यकांत गोफणे, आप्पा पाटील, सखाराम रेडेकर, राजेंद्र पाटील, नारायण भुरे, देविदास शेलार, गिरीश देवकाते, भास्कर गाडेकर, अविनाश भुरे , अभिमन्यू गाडेकर, संदीप दरेकर, संजय मराठे,  ह.भ.प. वाघ महाराज, ललित म्हसेकर, भूषण थोरवे, राजू नागणे, गणेश बनकर, राहुल शिंदे, अमित घोडसाळ, प्रवीण पाटील, सुरेश शिंदे, सचिन खराडे, अशोक कवडे, दुधभाते, शुभम फरांदे, किशोर शिंदे, रोहन दुर्गे, अविनाश जाधव, प्रवीण जगताप, राजेश पवार, जयसिंग जाधव, राजू मोरे, विक्रम भेगडे, अरविंद नाळे, दिनकर मोहिते, शामराव धस, आशिष कवडे, हनुमंत डुंबरे, सुनील भिसे, अनिल शिर्के, साईश कवाडे,  यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी शंकर जगताप यांनी नवी सांगवीतील फेमस चौक, स्वामी विवेकानंद सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर, सनशाइन रेसिडेन्सी, राजाराम नगर, भारत बेकरी रोड, ढोरे पाटील फार्म, सीएमई कॉलनी, संत तुकाराम नगर, समता नगर, गणेश नगर लेन १ ते ३, किर्ती नगर लेन १ ते ३, समर्थ नगर लेन १ ते २, समर्थ नगर ३, समर्थ नगर ४, चैत्रबन सोसायटी, आदर्श नगर, आदर्श नगर लेन १ ते ४, सरस्वती पार्क, सिद्धी पार्क, कृष्णाई रेसिडेन्सी, इंद्रप्रस्थ पार्क, शिवम पार्क, शिवाजी पार्क १ व २, पुष्पा पार्क, कृष्णानगर लेन १ ते ३, साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, विद्यानगर लेन १ ते ३, ज्ञानेश पार्क लेन १ ते ४, काटेपुरम सोसायटी, नंदनवन कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, साईनाथ कॉलनी, विनायक नगर लेन १ ते ३, सुयोग कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, कवडे नगर लेन १ ते ४, मयूर नगरी फेज १ व फेज २, रामनगर लेन १ ते ५, भक्तीदर्शन, चंद्ररंग पॅराडाईज, ओरियाना सोसायटी, गजानन नगर लेन १ ते ३, नेताजी नगर, गांगर्डे नगर, महाराष्ट्र नगर, व्हीएस रेसिडेन्सी, चंद्ररंग सॅटीन स्काय, काशीद नगर, आनंद पार्क, स्वप्न पार्क, टेन इलाईट सोसायटी, सहकारनगर, राजीव गांधी नगर लेन १ ते १० हा संपूर्ण परिसर पिंजून काढला.

याप्रसंगी जगताप यांनी नवी सांगवी प्रभागातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. त्याचबरोबर सर्व धार्मिक स्थळांनाही भेट देत तेथील प्रमुखांशीही चर्चा केली. विशेषतः या परिसरातील सर्व सोसायटींना भेट देऊन संबंधित सोसायटीचे चेअरमन, कार्यकारिणी सदस्य आणि रहिवाश्यांची बैठक घेऊन त्यांच्याशीही जगताप यांनी संवाद साधला.

दरम्यान, ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून तर नागरिकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी  स्वागत केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘अब की बार, शंकरभाऊ आमदार’ अशा घोषणा देत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास, यावेळी जगताप यांना दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!