34.8 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभेचा निकाल मतदारांनाही मान्य नाही!

विधानसभेचा निकाल मतदारांनाही मान्य नाही!

विधानसभेचा निकाल मतदारांनाही मान्य नाही

पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणाला अपेक्षित, तर कोणाला अनपेक्षित असाच म्हणावा लागेल. मात्र, मतदाराला तो पटला नाही. राज्यात निकालानंतर कुठेही उत्साह दिसत नसल्याचे चित्र आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील निकाला संदर्भात संशयाची दबक्या आवाजात चर्चा आह. तर, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थेटपणे ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा करत आहेत. मतदान केंद्रावरील अधिकारी देखील चिडीचूप आहेत. बऱ्याच गावात एकूण मतदान आणि मतमोजणीतील आकड्यात तफावत आहे.

बऱ्याच मतदारसंघात झालेले मतदान आणि मोजणी झालेली आकडेवारी जुळत नाही, याला काय म्हणायचे? असा प्रश्न युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.सुरवसे-पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात मतदारांनी कंबर कसली होती. मोठा रोष जनतेत होता व तो आजही आहे.“आम्हाला फुकट काही नको, विकत द्या पण नेमकेपणाने द्या. हाताला काम द्या, महागाईवर अंकुश ठेवा, मुला-बाळांना शिक्षण द्या, आरोग्य सुविधा द्या, रस्ते, पाणी, वीज अशा मुलभूत सुविधा हव्या आहेत. आम्हाला फुकट काही नको“ असा विचार कष्टकरी, कामगारवर्गाने केला होता. त्याच पद्धतीने त्यांनी मतदानही केले. मात्र, घडले वेगळेच. विधानसभा निकाल महायुतीचे निवडून आलेले आमदार सोडता कोणालाही रुचला नाही.विचाराला प्राधान्य देणारा समाज आज भयग्रस्त झाला आहे. मागील अडीच वर्षांपासून फक्त कोण कोणावर टीका करतोय या बातम्यांना ऊत आला आहे. सकाळी-सकाळी सर्वच दूरचित्रवाहिन्यावर टीका-टीप्पणीच्या बातम्या आहेत. तोडा-फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीता अलीकडच्या राजकारण्यांनी अवलंबिली आहे का, असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे. छत्रपतींच्या राज्यामध्ये सामान्यांना न्याय होता, तो आता राहिला आहे का, अशी विचारणा सामान्य जनता करीत आहे, असे सुरवसे-पाटील यांनी सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदार म्हणतात मतदान एकाला केले आणि निवडून दुसरेच आले. मतपेट्या बंद झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसच्या किमती वाढल्या. एक एक दिवस उलटला की, प्रत्येक वस्तूंची महागाई वाढलेली दिसणार आहे. प्रशासनात कोणी कोणाचे ऐकत नाही. सामान्यांना कुठेही न्याय मिळत नाही. आता सामान्यांनी दाद तरी कोणाकडे मागायची की गुलाम म्हणून जगायचे. एक्झिट पोलचे निकालही फोल ठरविले. ज्या उमेदवाराला ग्रामपंचायतीच्या अख्ख्या पॅनलमध्ये १२ मते पडली, तो उमेदवार निवडून येतोच कसा, उमेदवाराचा प्रचारही नाही, तोही निवडून आला. मायबाप सरकार तुम्हीच उत्तर द्या, अशी मतदार राजाकडून विचारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोट :

महायुती विरोधात जनतेच्या मनातील जो रोष लोकसभा निवडणूकीच्या वेळेला पाहायला मिळाला तो आजही कायम आहेच. विधानसभा निकाल हा जनतेचा कौल नसून मतदारांसोबत महायुतीने ईव्हीएम च्या माध्यमातून केलेली धोकेबाजी आहे. हा पूर्वनियोजीत निकाल असून लोकशाहीची हत्या भाजपने केली आहे. जनता मात्र आजही महाविकास आघाडीच्याच पाठीशी असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे.
..
रोहन सुरवसे पाटील
सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
54 %
2.9kmh
43 %
Fri
36 °
Sat
41 °
Sun
37 °
Mon
31 °
Tue
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!