पंढरपूर : सन २०२४ मध्ये पंढरपूर येथील सिलिकॉन कॉम्प्युटर सेंटरला विविध संगणक कोर्ससाठी महाराष्ट्रात सर्वाधिक प्रवेश दिल्याबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएलकडून राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची विभागीय बैठक सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडली. हा पुरस्कार एमकेसीएलच्या मॅनेजिंग डायरेक्टर वीणा कामथ यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार सिलिकॉन कॉम्युटर सेंटरचे संचालक राजेश विभुते यांनी स्वीकारला. पंढरपूर येथील सिलिकॉन संगणक प्रशिक्षण संस्था गेली कित्येक वर्षांपासून पंढरपूर येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे. यापूर्वीही या संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रशिक्षण सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना देवून संगणक प्रशिक्षण देऊन नोकरीला लावले व विद्यार्थांचा विश्वास संपादन केल्या बद्दल सन्मान करण्यात आला.
या यशामागे सिलिकॉन कॉम्प्युटर्स प्रशिक्षण संस्थेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, डॉ. दीपक पाटेकर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व संगणक संस्था चालक उपस्थित होते.
सिलिकॉन कॉम्प्युटरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा; एमकेसीएलकडून गौरव
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
28
°
C
28
°
28
°
34 %
2.2kmh
0 %
Fri
28
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°