पुणे – सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय चार्मकार महासंघचे युवक प्रदेशाध्यक्ष रविंद्र खैरे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे प्रदेश चिटणीस, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र पदी निवड करण्यात आली. मा. समाजकल्याण मंत्री, भाजपा अनु. जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे यांनी त्यांची नियुक्ती केली, तसे नियुक्ती पत्र ही खैरे यांना देण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा अनु.जा मोर्चा सरचिटणीस धनराज बिंद्रा, उपाध्यक्ष अतुल साळवे, उपाध्यक्ष राजू जाधव उपस्तिथ होते.
रवींद्र खैरे गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची ही निवड करण्यात आली. मला दिल्याला जवाबदारीला योग्य न्याय देऊन जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न सोडविणे त्याच बरोबर पक्ष संघटन मजबूत आणि वाढीसाठी देखील माझा प्रयत्न असेल असे नियक्ति नंतर रविंद्र खैरे यानी म्हंटले आहे.