पिंपरी- मराठवाडा( marathawada janvikas sangh) जनविकास संघाच्या १३ व्या वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाड्यातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी एक लाख रुपयांचा धनादेश कार्यकारिणीकडे सुपूर्द केला.
दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष अविनाश थिटे, सचिव सुर्यकांत कुरुलकर, सहसचिव वामन भरगंडे, सदस्य दत्तात्रय धोंगडे, आशिष पवार, बळिराम माळी, अभिमन्यू गाडेकर, अनिस पठाण, अजय सोनवणे, नामदेव पवार, शशिकांत दुधारे, सखाराम वालकोळी, नागेश जाधव, गौरीशंकर किन्नीकर, राजेश गाटे, शिवाजी सुतार, तसेच बाळासाहेब साळुंखे, किशोर आटरगेकर, सुनिल अंभोरे, सखाराम वाचकुळ, शंकर तांबे, बाळासाहेब काकडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, बालाजी पांचाळ, अनिता पांचाळ, राहुल शिंपले, विष्णु रसाळ, चिखली विभागाचे अध्यक्ष गोविंद तांबवाडे, उपाध्यक्ष निवृत्ती भोसले, सचिव सुग्रीव पाटील, खजिनदार रंगनाथ आवारे, सह. खजिनदार लक्ष्मण जाधव, सल्लागार गोरख पाटील निलंगेकर, दशरथ शिंदे, मल्लिकार्जुन शेट्टे, महादेव हडपद, सदस्य बिभिषण पवार, ज्ञानोबा साखरे, चतुर्भुज चव्हाण, संतोष लातुरे, सचिन जगदणे, संघटक बाबासाहेब चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघाची मुख्य कार्यकारिणी व घरकुल विभाग चिखलीची यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. घरकुल विभाग चिखली या ठिकाणी संस्थेची नूतन कार्यकारिणी नेमण्यात आली. या कार्यकारिणी फलकाचे पूजन व नियुक्तीपत्र माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या नूतन कार्यकारिणीने रुग्णवाहिका सेवेसाठी सव्वालाख रुपयांचा धनादेश दिला.
अरुण पवार यांनी संस्थेने गेल्या बारा वर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. गौरवशाली मराठवाड्याच्या मातीसाठी, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी व मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पिंपरी चिंचवड शहरात २०१२ मध्ये मराठवाडा जनविकास संघाची स्थापना करण्यात आली. नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी आपली जन्मभूमि मराठवाड्यातून उद्योगनगरीत येतात. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होता यावे, मराठवाड्याच्या विकासासाठी आणि मराठवाड्याचा जाज्वल्य इतिहास १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या उपक्रमातून मांडता यावा, ही महत्वाची भुमिका होती. अनेक लोकोपयोगी उपक्रमाबरोबरच मराठवाडा भवन निर्माण किंवा असे विविध संकल्प प्रगतीपथावर आहेत. तसेच पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातून एक लाख मराठवाडा भूमिपुत्रांची जनगणना करुन नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या तेरा वर्षापासून वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन, स्वच्छता अभियान, पशुधन वाचवा मोहीम या कामात कार्यरत आहे, अशी माहिती अरुण पवार यांनी दिली.
ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज यांनी व्याख्यानातून अरुण पवार यांच्या दातृत्वाविषयी, तसेच मराठवाडा (marathawada janvikas sangh) जनविकास संघाच्या कार्यविषयी विवेचन केले. प्रास्ताविक दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार गोविंद तांबवडे यांनी मानले.
मराठवाडा जनविकास संघाचा १३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
28
°
C
28
°
28
°
34 %
2.2kmh
0 %
Fri
28
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°