पुणे, — भारतीय प्रवास संस्कृतीत बदल घडवत, सीईओ कॅब्सने देशातील पहिली हायब्रिड टॅक्सी सेवा पुण्यात सुरू केली आहे. या सेवेत प्रवाशांना अॅपद्वारे किंवा थेट रस्त्यावरून ‘हात दाखवून’ कॅब थांबवण्याची सोय उपलब्ध आहे. “हात दाखवा, कॅब थांबवा” या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ संस्थापक बाहुबली दुर्गेश तिवारी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
प्रमुख वैशिष्ट्ये:
- शून्य कमिशन धोरण: चालकांकडून कोणतीही कमिशन रक्कम न घेता थेट उत्पन्न त्यांनाच मिळते
- आरटीओ मान्य दर: मीटरनुसार भाडे, कोणतीही लपवाछपवी नाही
- महिलांची सुरक्षितता: बिनधास्त बुकिंग, वैयक्तिक मोबाइल शेअर करण्याची गरज नाही
- स्थानिक चालकाशी संलग्नता: स्थानिक रिक्षाचालकांनाही अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला कपिल भानुशाली (अध्यक्ष), रौनक पटेल (कार्यकारी संचालक), वर्षा शिंदे-पाटील (मॉ साहेब कॅब संघटना), स्वप्निल राऊत (स्टॅटर्जी अँड प्लानिंग) हे मान्यवर उपस्थित होते.
तिवारी म्हणाले की, “सीईओ कॅब्स ही सेवा केवळ अॅप आधारित न राहता भारतीय रस्त्यांशी सुसंगत व प्रवाश्यांच्या गरजांनुसार रचना करण्यात आलेली आहे. ही स्वातंत्र्य, सन्मान आणि सुरक्षितता यांचा संगम करणारी सेवा आहे.”
कपिल भानुशाली यांनी नमूद केलं की, “ही सेवा सध्या पुणे व मुंबईत सुरू असून लवकरच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही विस्तार होणार आहे.”
स्वप्निल राऊत यांनी स्पष्ट केले की, “डेटा प्रोटेक्शन धोरणामुळे प्रवाश्यांची माहिती गोपनीय राहते. विशेषतः महिलांसाठी ही सेवा अधिक सुरक्षित आहे.”
रौनक पटेल म्हणाले, “ही केवळ एक सेवा नसून प्रामाणिकतेची चळवळ आहे. प्रवाशांसाठी सुलभता, आणि चालकांसाठी स्वावलंबन याला प्राधान्य देणारी ही एकमेव सेवा आहे.”
वर्षा शिंदे-पाटील यांनी सांगितले, “सीईओ कॅब्स इतर कंपन्यांप्रमाणे केवळ परवान्यांवर आधारित नसून राज्य शासनाच्या आरटीओ धोरणानुसार काम करणारी चालकहितैषी कंपनी आहे.”