31.3 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्र"शब्दांनी सजलेला सोहळा, उदय सामंतांच्या हस्ते महाकाव्य संमेलनाचे लोगो अनावरण"

“शब्दांनी सजलेला सोहळा, उदय सामंतांच्या हस्ते महाकाव्य संमेलनाचे लोगो अनावरण”

पिंपरी | प्रतिनिधी – पुण्यात १७ व १८ मे २०२५ रोजी होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५ च्या लोगोचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते नुकतेच मुंबई येथील एक्सप्रेस टॉवर, नरिमन पॉईंट येथे संपन्न झाले.

या महाकाव्य संमेलनाचे आयोजन नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी-पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मंत्री उदय सामंत यांना संमेलनाचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले. या प्रसंगी मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र ‘वादळकार’ सोनवणे, सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, आमदार तुकाराम काते, सचिव सौ. प्रीती सोनवणे, डॉ. अलका नाईक, संदीप लिंगायत, जगदीश लाड, अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


🔹 पिंपरीत दोन दिवसांचा कविसोहळा

या महाकाव्य संमेलनाचे आयोजन निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे दोन दिवसांसाठी करण्यात आले असून, संपूर्ण महाराष्ट्रातून ३५० हून अधिक कवी सहभागी होणार आहेत.

संमेलनात विशेष आकर्षण म्हणून –

  • काव्य ग्रंथ दिंडी
  • एकाच कवीचे एकाच वेळी १० काव्यसंग्रहांचे प्रकाशन (विक्रम नोंदविण्याचा उपक्रम)
  • ८ काव्य मैफली,
  • ८ पुस्तकांचे प्रकाशन,
  • ३ परिसंवाद

यांचा समावेश आहे. सहभागी कवींना विनामूल्य सहभाग, निवास, भोजन, चहा-नाश्ता, तसेच आकर्षक सन्मानचिन्ह व चार रंग छपाईतील सन्मानपत्र देण्यात येणार आहे.


🔹 दिग्गजांचा सहभाग

संमेलनाचे अध्यक्ष कवी म.भा. चव्हाण तर उद्घाटक म्हणून मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
स्वागत अध्यक्ष युवा आमदार शंकरभाऊ जगताप,
प्रमुख पाहुणे उद्योजक कृष्णकुमार गोयल,
दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत संमेलन अधिक भव्यतेने पार पडणार आहे.

तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, आणि उद्योजक क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


🔹 संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष

नक्षत्राचं देणं काव्यमंच ही संस्था गेली २५ वर्षे साहित्य व काव्यक्षेत्रात सक्रिय असून कवींना लिहिते आणि बोलते करणारे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. संस्थेचा हा रौप्य महोत्सवी वर्ष असून, या पार्श्वभूमीवर हे संमेलन एक ऐतिहासिक आणि गौरवशाली पर्व ठरणार आहे.


📢 सर्व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड शहराची ‘कवितेची राजधानी’ म्हणून ओळख वाढवणाऱ्या या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून त्याला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.3 ° C
31.3 °
31.3 °
47 %
1.5kmh
83 %
Sat
33 °
Sun
37 °
Mon
32 °
Tue
36 °
Wed
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!