पिंपरी – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिंचवड यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ पासून तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेचा प्रारंभ होत असून श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे रोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यान सुरू होईल. व्याख्यानमालेत गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी ज्येष्ठ समुपदेशक दत्ता कोहिनकर ‘मनाची अमर्याद शक्ती व समाजस्वाय्थ’ या विषयावर प्रथम पुष्पाची गुंफण करतील. शुक्रवार, दिनांक १६ मे २०२५ रोजी प्राचार्य प्रदीप कदम ‘इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी प्रा. डॉ. संजय कळमकर ‘आनंदी जीवनाच्या वाटा’ या विषयाच्या माध्यमातून अंतिम पुष्पाची गुंफण करतील. नि:शुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक व श्री स्वामी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी केले आहे.
१५ मेपासून श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेचा प्रारंभ
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
29.7
°
C
29.7
°
29.7
°
32 %
2.6kmh
0 %
Fri
31
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°