29 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमहाराष्ट्रभूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय! 

भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय! 

चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर रद्द!

महानगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चिखली- कुदळवाडीतील प्रस्तावित TP स्किम कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश मिळाले असून, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे.

चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ बाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली होती. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज दि. 15 मे 2025 रोजी प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सभेला मान्यता दिली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून 3 ते 4 वेळा आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनींचे शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले आहे. 1970 च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगधंद्यांसाठी भूसंपादन केले, हा पहिला अन्याय झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करुन आमचा विरोध असतानाही जमिनी ताब्यात घेतल्या. टाटा मोटर्स कंपनीच्या विस्तारासाठी पुन्हा आमच्या जमिनींवर भूसंपादनाची कारवाई केली. प्रत्येकवेळी भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या भागात टीपी स्कीम लागू नये, अशी आग्रही भूमिका प्रशासनासमोर मांडली. त्याला यश मिळाले आहे.
***

चऱ्होलीबाबत भूमिपुत्रांसाठी लढणार!
मौजे चिखलीतील प्रस्तावित TP Scheme प्रशासनाने रद्द केली. मात्र, अद्याप मौजे चऱ्होलीतील प्रस्तावित TP Scheme बाबत निर्णय झालेला नाही. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह ग्रामस्थ, भूमिपुत्र यांची बाजू ऐकूण घेणार आहेत. त्यासाठी आयुक्त- ग्रामस्थ यांची श्री वाघेश्वर महाराज मंदिरात लवकरच बैठक घेण्यात येईल. भूमिपुत्रांचा TP Scheme ला का विरोध आहे? याबाबत सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवूनच निर्णय घेण्यात येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, चऱ्होलीची TP Scheme सुद्धा चिखली-कुदळवाडीप्रमाणे रद्द करावी, अशी आमची ठाम मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
***

प्रतिक्रिया :
चिखली-कुदळवाडीचा TP Scheme रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांचे आभार व्यक्त करतो. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. याच धर्तीवर आता चऱ्होलीची TP Scheme संदर्भातील प्रक्रियाही रद्द करावी. कारण, भूमिपुत्रांचा या स्कीमला विरोध आहे. संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) आगामी तीन महिन्यांत अंतिम होईल. त्यामुळे चऱ्होलीसाठी नवीन TP Scheme आवश्यकता नाही, अशी माझी भूमिका आहे. लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक, जागामालक, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे.
महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29 ° C
29 °
29 °
32 %
3.5kmh
0 %
Fri
29 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!