28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रकसबा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा

कसबा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा

‘शिव पर्वती विवाह सोहळा’ ठरला जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला.यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फूटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.महाराष्ट्रातील प्रसिद्ध
श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत ‘शिव पर्वती विवाह सोहळा’(जिवंत देखावा)या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.या भव्य,नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, छत्रपती संभाजी महाराजांचे दुधभाऊ, विरधाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, किल्ले रायगड निर्माता हिरोजी इंदलकर यांचे वंशज समीरजी इंदलकर, सरसेनापती विरबाजी पासलकर यांचे वंशज सरसेनापती अविनाशदादा पासलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज राजेंद्रदादा मोहिते पाटील,गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य विश्वस्त. श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील, सरनौबत येसाजी कंक यांचे 14 वे वंशज रविंद्र श्रीपतराव कंक,पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातील अभिनेते अनुप सिंग ठाकूर उपस्थित होते.

यावेळी मेघराज राजेभोसले,आदित्य जयकुमार गोरे ,मेघना किशोर तरवडे,बाळासाहेब दाभेकर,अमित कंक,सम्यक साबळे,संजय अग्रवाल,ज्योती सावर्डेकर,मा.नगरसेवक योगेश समेळ,विशाल धनवडे,पल्लवीताई जावळे, या मान्यवरांनी हजेरी लावली.

यावेळी त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ शिवकालीन मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले,यंदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. जन्मोत्सव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!