- पुणे,:पुणे महानगरपालिका , बजाज फिन्सर्व्ह आणि युनायटेड वे ऑफ दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “नीव प्रकल्पा” अंतर्गत शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात PMC शाळांमध्ये मूलभूत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २७ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
- या कार्यक्रमाचा उद्देश शाळांमध्ये नवोपक्रम, समर्पण आणि विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणे हा होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे PMC शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.
- PMC कार्यालयात पार पडलेल्या या समारंभात शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री विजयकुमार थोरात, उप प्रशासकीय अधिकारी श्रीमती शुभांगी चव्हाण, बजाज फिन्सर्व्हच्या नॅशनल लीड सीएसआर ऑफिसर श्रीमती लिना राजन, सीएसआर ऑफिसर श्रीमती योजना पळसे, युनायटेड वे ऑफ दिल्लीचे CEO डॉ. सुजीत रंजन आणि ५० हून अधिक उपस्थितांनी सहभाग घेतला.
- श्री विजयकुमार थोरात यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकास सुरू राहावा यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला आजचा हा सन्मान आहे.”
- बजाज फिन्सर्व्हच्या श्रीमती शेफाली बजाज यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना, “शिक्षक ज्ञानाचा दीप आहेत, त्यांच्या आशीर्वादानेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते,” असे सांगितले.
- United Way of Delhi चे CEO डॉ. सुजीत रंजन म्हणाले, “शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पणाची दखल घेणे शिक्षण व नवोपक्रमाच्या संस्कृतीसाठी आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होते.”
- हा गौरव समारंभ शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला सलाम करतो आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची पुनःपुष्टी करतो.
अंगणवाडी सेविका कौतुक सोहळा :
महिला बाल विकास विभाग, बजाज फिन्सर्व्ह आणि युनायटेड वे ऑफ दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “नीव प्रकल्पा” अंतर्गत अंगणवाडी सेविका कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सरकारी अंगणवाड्यांमध्ये मूलभूत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचा उद्देश अंगणवाडी सेविकांच्या समर्पण, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांचा गौरव करणे हा होता. त्यांच्या प्रभावी अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद आणि शाळेतील सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे या सेविका विशेषत्वाने उल्लेखनीय ठरल्या आहेत.
कार्यक्रमात महिला बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकारी श्री दिलीप हिवराळे (CDPO), श्रीमती भालेराव (CDPO), श्रीमती मनीषा बिलारीस (नोडल अधिकारी), बजाज फिन्सर्व्हच्या श्रीमती लिना राजन (नॅशनल लीड सीएसआर ऑफिसर), श्रीमती योजना पळसे (सीएसआर ऑफिसर) आणि United Way of Delhi चे CEO डॉ. सुजीत रंजन यांच्यासह ८० पेक्षा अधिक उपस्थितांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमात बोलताना नोडल अधिकारी मनीषा बिलारीस म्हणाल्या, “शिक्षक आणि अंगणवाडी सेविका हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. कठीण परिस्थितीतही प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण आणि विकास सुरू राहावा यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला आजचा हा गौरव समारंभ एक सलाम आहे.”
United Way of Delhi चे CEO डॉ. सुजीत रंजन यांनी सांगितले, “शिक्षक आणि अंगणवाडी सेविका हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पणाची दखल घेणे शिक्षण व नवोपक्रमाच्या संस्कृतीसाठी आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होते.

बजाज फिन्सर्व्हच्या श्रीमती शेफाली बजाज यांनीही अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक करत, “शिक्षक ज्ञानाचा दीप आहेत, त्यांच्या आशीर्वादानेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते,” असे सांगितले.