35.9 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रसिंगापूरला निघाले 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा

सिंगापूरला निघाले ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; सिंगापूरमध्ये साजरा होणार पाच दिवसांचा गणेशोत्सव



पुणे : गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि पुण्याप्रमाणेच सातासमुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा व्हावा, याउद्देशाने सिंगापूरला दगडूशेठ गणपती बाप्पा निघाले. दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूर मधील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आली. यामुळे सिंगापूरमधील भारतीय समाजात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे प्रस्थापित होत असून, जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरला येत असल्याने तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ येथे पाठविण्यात येणा-या श्रीं च्या मूर्तीचे विधीवत पूजन मंदिरात करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मूर्तीकार भालचंद्र उर्फ लाला देशमुख, राजाभाऊ घोडके आदी उपस्थित होते. श्रीं च्या मूर्तीची उंची सव्वा तीन फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी महिनाभरात साकारली आहे.



कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, सिंगापूरमधील मंडळासाठी तीन वर्षांपूर्वी मूर्ती दिलेली होती. मागील वर्षी मंडळाने या मूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे सर्व अलंकारांनी सजलेली बाप्पांची मूर्ती यंदा गणेशभक्तांसाठी पाठवत आहोत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर येथे गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरातील हिंदू बांधव एकत्र येतो आणि त्यांना गणपती बाप्पांचा आशिर्वाद प्राप्त होतो. बाप्पाची पूजा संपूर्ण जगभरात होते, त्यामुळे ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ही मूर्ती पाठवत आहोत. यानिमित्ताने संस्कृती व धर्माची पताका सिंगापूरसह संपूर्ण जगभरात उंचावत राहो, असेही त्यांनी सांगितले.

सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजेय कुलकर्णी म्हणाले, सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करणार आहे. सन १९९४ पासून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या या मंडळाचा उद्देश सिंगापूरमधील महाराष्ट्रीयन समाजात आपुलकी, सौहार्द, एकोपा आणि सांस्कृतिक जाणीवा वाढवणे हा असून, गेल्या तीन दशकांपासून मंडळ महाराष्ट्राची समृद्ध परंपरा विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जपते आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खास आकर्षण ठरणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे येथून सिंगापूरमध्ये आणलेली गणेशमूर्ती. यामुळे सिंगापूरमधील भारतीय समुदायासाठी हा सण अधिक गौरवशाली आणि संस्मरणीय ठरणार आहे. पाच दिवस चालणा-या या उत्सवात धार्मिक पूजा-अर्चा, आरत्या, पारंपरिक ढोल-ताशा आणि लेझीम सादरीकरण, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.9 ° C
35.9 °
35.9 °
60 %
1.7kmh
84 %
Fri
36 °
Sat
42 °
Sun
39 °
Mon
32 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!