कोथरूड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘पुणे ऑन पेडल्स’ या उपक्रमांतर्गत भव्य सायकल रॅली व वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात ५ हजारांहून अधिक पुणेकरांच्या उपस्थितीती होती. मनसे पक्षात शाखाध्यक्ष व विविध पदांवर कार्य केलेल्या कोथरूड येथील यामिनी मठकरी यांनी भारतीय जनता पार्टीत यावेळी प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
या पक्ष प्रवेशासाठी, यामिनी मठकरी यांनी त्यांच्या मार्गदर्शिका डॉ . मेधा कुलकर्णी यांचे आभार मानले, व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी, माझा पक्ष प्रवेश झाला, ही खास आठवण मेधाताईंनी मला दिली अश्या भावनाही मठकरी यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यासह भाजप पदाधिकारी दिलीप वेडेपाटील, जयंता भावे, अनिता तलाठी, निनाद पटवर्धन, जान्हवी जोशी, कल्याणी टोकेकर आदी उपस्थित होते.