13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आ. शंकर जगताप यांच्याकडे पक्ष नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आ. शंकर जगताप यांच्याकडे पक्ष नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी!

१२८ नगरसदस्य; आमदार जगताप यांच्याकडे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी

  • आमदार शंकर जगताप सांभाळणार पिंपरी चिंचवडची कमान
  • पिंपरी,-: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका केंद्रस्थानी ठेवत मोठी घोषणा केली. जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना पिंपरी चिंचवड शहरातील आगामी निवडणुकांची मोठी जबाबदारी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. शहराचे निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र भाजपच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवडचा गड भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रस्थापित केला. 2017 मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पिंपरी चिंचवडमध्ये मोठा पक्ष म्हणून पुढे आला. थम्पिंग मेजॉरिटीने भाजपने तब्बल 77 नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात नेले. भाजपाला पहिला महापौर या शहराला लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली मिळाला.

दरम्यान शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या आणि संघटन कौशल्य, व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे कसब असलेल्या चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप आगामी निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहराची कमान सांभाळणार आहेत. शहरामध्ये महापालिका निवडणुकीसाठी 128 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
………

जगताप यांच्याबद्दल विश्वासाची मोहर

पिंपरी चिंचवड शहराचे नाव विकसित शहरांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. या शहराच्या गरजा, पुढील पन्नास वर्षाचे नियोजन, भाजपाच्या संकल्पनेतील विकसित शहर या दृष्टिकोनातून भाजपला या शहरांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवायचे आहे. त्या दृष्टीने उच्च विद्या विभूषित असलेल्या उमद्या नेतृत्वाकडे प्रदेश नेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. या दृष्टीने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पडतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

………

प्रतिक्रिया

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक–2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारी यांची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर मला पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रात “निवडणूक प्रमुखपदी” नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची व अभिमानाची बाब आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. हा विश्वास सार्थ ठरेल याची मी ग्वाही देतो.
या निवडणुकांसाठी मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांचे संघटन, पदाधिकाऱ्यांचा संवाद आणि सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे कार्य व जनकल्याणकारी योजना प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी अखंडपणे कार्यरत राहीन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!