राजगुरुनगर- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर-खेड मतदारसंघासाठी आमदार अमित गोरखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आमदार गोरखे यांनी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कार्यदृष्टी तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना जाणून घेतल्या.

या मुलाखती काल राजगुरुनगर येथे आमदार अमित गोरखे, उत्तर पुणे ( मावळ )जिल्हा निवडणूक प्रमुख श्री. महेश दादा लांडगे, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप दादा कंद, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. या वेळी पक्ष संघटनेतील पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये जनतेशी नाळ जोडलेले, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख उमेदवार पुढे यावेत, यासाठी या मुलाखतींचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले.

या प्रसंगी आमदार अमित गोरखे म्हणाले,
“राजगुरुनगर-खेड मतदारसंघात जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा आमच्या सोबत आहे. आगामी निवडणुकीत येणारी सत्ता आमचीच असेल विकासाच्या ध्यासाने आणि जनतेच्या आशीर्वादाने विजयाचा झेंडा आमचाच फडकणार आहे.” देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या पर्वाची पुन्हा पुनरावृत्ती होणार!”


