धामणी (तालुका आंबेगांव)येथील पुरातन म्हाळसाकांत खंडोबा मंदिराच्या व परिसराच्या जिर्णोध्दाराचे काम लोकवर्गणीतून हाती घेऊन पौराणिक मंदिर संस्कृतीचे व धार्मिक वास्तुचे जतन करुन देवस्थानाचा व परिसराचा चेहरामोहरा बदलल्याने धामणी येथील खंडोबा देवस्थान महाराष्ट्रात जागृत व प्रेक्षणीय झाले असल्याचे गौरवोद्गगार सखाराम महाराज संस्थान अंमळनेरचे(जि.जळगांव) प्रमुख ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी काढले. श्रीक्षेत्र आळंदीहून अमंळनेरला जाताना अंमळनेरकर पायी दिंडी शुक्रवारी (२०नोव्हे) धामणी येथील पुरातन श्रीराम मंदिरात मुक्कामासाठी येताना दिंडीसह येथील पुरातन श्री खंडोबा जाऊन कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर खंडोबा मंदिराची व परिसराची व मंदिर परिसरात सुरु असलेल्या पस्तीस हजार लिटर क्षमतेच्या पाण्याचे टाकीचे बांधकामाची पाहाणी करुन समाधान व्यक्त केले..

१३ नोव्हेंबर १९९८रोजी या खंडोबा मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या कामाचा शुभारंभ अंमळनेरकर महाराज यांच्याच हस्ते झाला असल्याची आठवण यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिली.मंदिरातील दर्शनबारी.जागरण देवकार्य मंडप.सभामंडप.शिखराचे नूतनीकरण.व रंगभरणी.मंदिर परिसरातील लग्न कार्यासाठी बांधलेला कुलस्वामी हाँल.गायवासरु.हत्ती.सिंह. वाघ.घोडे.द्बारपाल व संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भेटीचे “भक्तिशक्ति सह विविध आकर्षक संगमरवरी शिल्प इत्यादी कामे केल्यामुळे मंदिर व परिसर प्रेक्षणीय झालेला आहे यापुढे मंदिर व परिसरात विकासाची व जिर्णोध्दाराची कामे करताना मंदिराचे पावित्र्य व नैसर्गिक समतोल व पौराणिक वारसा जपताना येथे सिमेंटची जंगले होऊन देऊ नका असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.खंडोबा मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंग परिसराचा व सभामंडपातील स्वयंभू खंडोबा व म्हाळसाई अश्वारुढ शिल्पाचा करण्यात आलेला जिर्णोध्दार.तसेच सोमवती सोहळ्याला येणार्या भाविकांसाठी सुरु करण्यात आलेला महाप्रसादाचा (अन्नदान)व दर महिण्याच्या पौर्णिमेला खंडोबाच्या करण्यात येणार्या पारंपारिक पूजा.व पौष पौर्णिमेला होणारा खंडोबा व म्हाळसाई विवाह सोहळा.हे पुरातन धार्मिक उपक्रम देवस्थान करत असून या छोट्या रोपट्याचा लवकरच मोठा वटवृक्ष होणार असल्याचे अंमळनेरकर महाराज यांनी यावेळी सांगितले.या ठिकाणी दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या दिवसेदिवस वाढत असून सवंग प्रसिध्दीचा मोह टाळून देवस्थानाच्या सत्कार्यात सर्वानी सहभागी झाले पाहिजे.आध्यात्मिक वारकरी सांप्रदाय हा परोपकारी पंथ असून झोपी गेलेल्यांना साधूसंत जागे करण्याचे काम करत आहेत.माणसे संसारात चिंता करतात.त्यांनी चिंता न करता कुलदैवताचे व कुलदेवतेचे नामस्मरण करावे.सुख समाधान आपोआप मिळेल.असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पुरातन खंडोबा मंदिरात ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचा देवस्थानाच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.प्रमोद देखणे
.विठ्ठल बढेकर.बाबाजी गाढवे.बाळू बढेकर.नामदेव भगत.राजेश भगत अजित बोर्हाडे.बाळूकाका बेरी.मुकुंद क्षिरसागर उपस्थित होते.


