12.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रप्रारूप मतदार यादीतील गोंधळावर भाजपचा आवाज बुलंद

प्रारूप मतदार यादीतील गोंधळावर भाजपचा आवाज बुलंद

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकतीच जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी २०२५ मोठ्या प्रमाणावर त्रुटीपूर्ण असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पिंपरी–चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन देण्यात आले. या निवेदनात मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.

काटे यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की, प्रारूप यादीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नावे गायब आहेत, अनेक नावे चुकीच्या प्रभागांमध्ये स्थलांतरित झाली आहेत, दुबार नोंदी, चुकीचे पत्ते, तसेच यादी तपासण्यासाठी सक्षम ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसणे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व संभ्रम वाढत आहे. शहरभरातून येणाऱ्या या तक्रारींना गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आयोगाचे लक्ष वेधले.

काटे यांनी सांगितले की,
मतदानाचा हक्क हा लोकशाहीतील सर्वात मूलभूत हक्क आहे. त्यावर अशा त्रुटींचा परिणाम होणे म्हणजे नागरिकांना थेट न्याय न मिळणे होय. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेने या विसंगती तातडीने दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे.”

या परिस्थितीचा विचार करता शत्रुघ्न काटे यांनी हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत किमान 10 दिवसांनी वाढवावी, अशी ठोस मागणी केली. नागरिकांना अडथळ्यांशिवाय माहिती मिळावी म्हणून आयोगाने विशेष हेल्पडेस्क, ऑनलाइन शोध प्रणाली, तसेच सहाय्य केंद्र तातडीने सुरु करावीत, अशीही विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली.

काटे पुढे म्हणाले,
अचूक मतदार यादी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची पायाभरणी असते. त्रुटीपूर्ण आणि गोंधळाची यादी ठेवणे म्हणजे नागरिकांवर अन्याय करण्यासारखे आहे. पिंपरी–चिंचवड शहरातील प्रत्येक मतदाराचा हक्क संरक्षित राहावा, यासाठी आयोगाने तात्काळ आणि प्रभावी पावले उचलावीत.”

शहरातील विविध प्रभागांतून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे निवेदन महत्त्वाचे ठरत आहे. आगामी निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि शुचिता टिकवण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण पिंपरी–चिंचवडचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
62 %
1.5kmh
0 %
Tue
14 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!