
पुणे: ‘जय साईराम… साईबाबा की जय’ असा अखंड साईनामाचा जयघोष करीत श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. भाविकांनी केलेल्या या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. साईभक्तांनी साईनामाचा गजर करीत पालखीचे स्वागत केले. पालखी मार्गावर फुलांची उधळण, सजवलेला रथ आणि भक्तिरसात न्हाऊन गेलेल्या भाविकांसोबत पालखी प्रदक्षिणा पार पडली.
यावेळी श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, वैभव नवसे, उमेश झेंडे, विजय मोरे, कुमार लांडे, कैलास जाधव, ओमकार लांडगे, अमोल शिंदे, संजय पवळे, संदीप गवळी, दिनेश गालफाडे, विजय साळवे, योगेश झेंडे आणि मित्र परिवार उपस्थित होते. दिनांक २३ ते ३० नोव्हेंबर दरम्यान साई उत्सव होणार आहे.
तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साई मूर्तीचे मंगल स्नान, साई पादुकांची महापूजा व अभिषेक श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद साईबाबांची सांज आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबिर देखील उत्सवात होणार आहे.
.


