23.1 C
New Delhi
Wednesday, November 26, 2025
Homeमहाराष्ट्र१ लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त

१ लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्कभरारी पथकाच्या कारवाई

पुणे,-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक तीनच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार खेड तालुक्यात नाणेकरवाडी हद्दीतील मुत्केवाडी या ठिकाणी अवैद्य मद्यविक्री अड्ड्यावर छापा टाकून २५ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सदर ठिकाणी देशी दारू पावर लाईन पंच मद्याच्या १८० मिली व ९० मिली क्षमतेच्या एकूण ६४४ बनावट सिलबंद बाटल्या तसेच विदेशी मदयाच्या बनावट ७१ सीलबंद बाटल्या व बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा सर्व मिळून १लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अहमदसाब पठाण व हरीष ब्रिजेश कुमार चंद्रा यांना अटक करून मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांच्यासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर करून आरोपींची रवानगी येरवडा कारागृह पुणे येथे केली आहे.

या कारवाईत भरारी पथक क्रमांक ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे यांच्यासह सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस डी साठे, जवान सर्वश्री अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते व जवान -नि- वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य, बनावट मद्य, गावठी हातभट्टी दारू निर्मिती, विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
28 %
2.1kmh
0 %
Wed
24 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!