12.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रविकसित भारताचे पायाभूत स्तंभ लाईटहाऊस केंद्रांतून घडणार – आमदार शंकर जगताप

विकसित भारताचे पायाभूत स्तंभ लाईटहाऊस केंद्रांतून घडणार – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने निर्मित किवळे लाईटहाऊस केंद्राचे आ. शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, – : शहरातील विविध उद्योगधंद्यांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्याची फॅक्टरी लाईटहाऊस आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देश ज्या गतीने पुढे जात आहे, त्या विकसित भारताचे मजबूत पायाभूत स्तंभ या लाईटहाऊस केंद्रांमधून घडणारे युवकच असतील, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या किवळे येथील नवीन लाईटहाउस केंद्राचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका सहायक आयुक्त राजाराम सरगर, प्रशासन अधिकारी अनिता बावीसकर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, मिलींदकुमार भोसले, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या सहसंस्थापक रूची माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा किशोर, मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुळकर तसेच लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण घेणारे युवक व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, शहरात सध्या ११ लाईटहाऊस केंद्रे कार्यरत आहेत. परंतु आजच्या वाढत्या कौशल्य गरजा, उद्योगधंद्यांची वाढती अपेक्षा आणि युवकांच्या भावी संधी लक्षात घेता लाईटहाऊस केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आजच्या काळात स्किल्ड मॅनपावरची सर्वाधिक मागणी आहे. उद्योगधंद्यांपासून ते सेवा क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षित, सक्षम आणि जबाबदार तरुणांची आवश्यकता वाढत चालली आहे. हीच गरज पूर्ण करणारी अत्याधुनिक कौशल्यनिर्मितीची ‘फॅक्टरी’ म्हणजे लाईटहाऊस केंद्र आहे.

आत्मनिर्भर भारताची संकल्पना आज संपूर्ण देशाला दिशा देत आहे. आत्मनिर्भरतेची ही वाटचाल केवळ आर्थिक प्रगतीचा विचार करत नाही, तर प्रत्येक नागरिकाला स्वावलंबी आणि कुशल बनविण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाते. म्हणूनच विकसित भारत निर्माण करण्याच्या या मोठ्या दृष्टीकोनाचा पाया अशाच लाईटहाऊस केंद्रांमधून घडणारे कौशल्यसंपन्न युवक असतील, असेही आमदार जगताप यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ पासून युवक कौशल्यविकासासाठी संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. १८ ते ३० वयोगटातील गटातील युवकांना स्वतंत्र निर्णयक्षमता, रोजगारक्षम कौशल्ये आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘कौशल्यम लाईटहाउस’ केंद्रांच्या माध्यमातून हा कार्यक्रम शहरातील वंचित युवकांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरत आहे.
…..

२०२७ पर्यंत २० हजाराहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय

या शहरव्यापी उपक्रमाअंतर्गत २०२७ पर्यंत ३५,००० युवकांची रोजगारक्षमता वाढविणे आणि २० हजार युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत महापालिका क्षेत्रातील १०,५०० पेक्षा अधिक युवकांनी फाउंडेशन कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले असून ४,८०० हून अधिक युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय १०० पेक्षा अधिक स्किलिंग पार्टनर्स आणि ५०० पेक्षा अधिक उद्योगसमुहांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

लाईटहाउस हा केवळ कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम नसून युवकांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडविण्याची क्षमता विकसित करणारा व्यापक उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश वर्गभेद कमी करणे, सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे आणि शासन व नागरिक यांच्यात थेट संवादाची सशक्त पद्धती तयार करणे हा आहे.
……
आतापर्यंत शहरात विविध ११ ठिकाणी लाईटहाऊस केंद्रांची उभारणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक लाईटहाउस केंद्रासाठी आवश्यक इमारत, पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयनासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नेहरूनगर, दापोडी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, आकुर्डी, बोपखेल, किवळे या ठिकाणी लाऊटहाऊस केंद्रे उभारण्यात आली आहेत.

किवळे येथील लाऊटहाऊस केंद्रामुळे आसपासच्या परिसरातील युवकांना करिअरसंबंधित कौशल्यप्रशिक्षण आणि रोजगारसंधींचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शहरातील युवकांसाठी उज्ज्वल भविष्याची दारे खुली होणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
62 %
1.5kmh
0 %
Tue
14 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!