पुणे : सखी एक्झिबिशन आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन गांधीभवन आठवडी बाजार मैदान येथे ग्राहकांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी प्रदर्शनाच्या आयोजिका अध्ययनी पोरे यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.
या प्रदर्शनात एकूण ४० स्टॉल्स असून येथे कपडे, ज्वेलरी, होम डेकोर, पॅक्ड फूड, ज्योतिष सेवा तसेच खवय्यांसाठी विविध पदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे. विशेष आकर्षण म्हणून चितळे यांचे आईस्क्रीम विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आयोजिका अध्ययनी पोरे गेल्या ८ वर्षांपासून हा उपक्रम राबवीत असून आतापर्यंत त्यांनी सुमारे ८५ प्रदर्शने यशस्वीरीत्या आयोजित केली आहेत.
हे प्रदर्शन शनिवार, दिनांक २७ डिसेंबर व रविवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सखी एक्झिबिशन—उद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीठ
New Delhi
clear sky
19.6
°
C
19.6
°
19.6
°
15 %
0.5kmh
1 %
Fri
20
°
Sat
21
°
Sun
21
°
Mon
21
°
Tue
22
°


