37.9 C
New Delhi
Sunday, July 12, 2026
HomeBlogसोनालिकाने होशियारपूर येथील प्रकल्पातून २० लाखाव्या ट्रॅक्टरचे केले भव्य अनावरण

सोनालिकाने होशियारपूर येथील प्रकल्पातून २० लाखाव्या ट्रॅक्टरचे केले भव्य अनावरण

केवळ उत्पादनाचा टप्पा गाठणे इतकेच नाही, तर २० लाखावा ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांना ‘जिंकण्याचे सामर्थ्य’ देऊन त्यांना सक्षम करण्याच्या आणि ग्रामीण समुदायांमध्ये शाश्वत मूल्य निर्माण करण्याच्या सोनालिकाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.

पुणे, – भारतातील ट्रॅक्टर निर्यातीतील आघाडीचा ब्रँड असलेल्या ‘सोनालिका ट्रॅक्टर्स’ने नुकताच पंजाबमधील होशियारपूर येथील आपल्या ‘जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्पा’तून २० लाखाव्या ट्रॅक्टरचे भव्य अनावरण केले. हे नवीन संपादन जागतिक दर्जाच्या नाविन्यपूर्णतेच्या जोरावर शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देणारी उत्पादने विकसित करण्याच्या कंपनीच्या ३० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवते आणि जगातील प्रमुख ट्रॅक्टर उत्पादकांमध्ये कंपनीचे स्थान अधिक प्रबळ करते.

सोनालिकासाठी गुणवत्तेचे सर्वोच्च निकष राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यासाठी कंपनी सातत्याने रोबोटिक्स व ऑटोमेशनवर आधारित प्रगत स्वयंचलित प्रक्रियांचा वापर करते. शेतकऱ्यांचा दीर्घकालीन विश्वास संपादन करण्यासाठी, कामगिरी, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता यांबाबतच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सोनलिकाचा प्रत्येक ट्रॅक्टर कसून चाचण्या आणि पडताळणीच्या विविध टप्प्यांतून जातो. या ब्रँडच्या प्रचंड उत्पादन क्षमतेचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, शक्तिशाली ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी लागणारा प्रत्येक सुटा भाग स्वतःच्या कारखान्यातच तयार करण्याची पूर्ण क्षमता या सुविधेत आहे.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक मित्तल म्हणाले, “आमच्या २० लाखाव्या ट्रॅक्टरचे अनावरण हे भारतीय अभियांत्रिकी कौशल्यावर आणि दूरदृष्टी, नावीन्य व उत्कृष्ट अंमलबजावणीच्या जोरावर विविध भौगोलिक प्रदेश आणि कृषी परिस्थितींमध्ये किती मोठी मजल मारता येते, यावर भर देते. तीन दशकांपूर्वी होशियारपूरमध्ये सुरू झालेला हा प्रवास आज १५० हून अधिक देशांतील शेतकऱ्यांना उत्साह देत आहे, ज्यामुळे सोनालिका एक जागतिक स्तरावर प्रतिष्ठित ब्रँड आणि भारतातील नं.१ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड म्हणून स्थापित झाला आहे. या यशाचा आम्हाला अभिमान वाटत असला तरी आम्ही विकासाला गती देणे, आमचा आंतरराष्ट्रीय ठसा अधिक दृढ करणे आणि नावीन्य, चपळता व उत्कृष्ट अंमलबजावणीच्या जोरावर जागतिक नेतृत्वाचा पुढील अध्याय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
37.9 ° C
37.9 °
37.9 °
34 %
3.4kmh
7 %
Sun
42 °
Mon
42 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments