6.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
HomeBlogईपीएफओच्या हायर पेन्शन निवृत्तीधारकांना न्याय मिळवून देणार…!

ईपीएफओच्या हायर पेन्शन निवृत्तीधारकांना न्याय मिळवून देणार…!

पुणे:कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ)मधील हायर पेन्शन (१९९५)योजनेसाठी ज्या पेन्शनधारकांनी संपूर्ण कागदपत्राच्या पूर्ततेसह अर्ज कर्मचारी भविष्य निधी कार्यालयात (ईपीएफओ)२०२३ साली सादर केले आहे.ते अर्ज ग्राह्य धरा अथवा त्यांना ईपीएफओने त्वरेने आँनलाईन पोर्टल(UAN )उपलब्ध करुन देऊन त्या हजारो पेन्शनधारकांना उच्च पेन्शन योजनेसाठी पात्र करण्याची निवृत्तीधारकांनी केलेली मागणी मान्य करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण व केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री श्रीमती शोभाजी करंदलाजे यांना भेटून हजारो पेन्शनधारकांना नक्की न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ व जेष्ठ खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले असल्याचे पेन्शनधारकांनी सांगितले.

पेन्शनधारकाची उच्च पेन्शन योजना(१९९५) म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील एक ऐच्छिक योजना आहे.जी कर्मचार्‍याच्या वास्तविक वेतनावर आधारीत पेन्शनची गणना करण्यात येते.ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर जास्त दरमहा पेन्शन मिळू शकते.परंतु त्यासाठी कर्मचारी आणि नियोक्ता(कंपनी किंवा संस्था)दोघांनीही ईपीएस मध्ये जास्तीतजास्त योगदान देणे आवश्यक असते.यामध्ये सामान्य पेन्शन वेतनाची मर्यादा या योजनेतून काढून टाकली जाते.ही योजना ऐच्छिक असून ज्यांना जास्तीतजास्त फरकाची रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे जमा करुन जास्त पेन्शन हवी आहे.तेच या योजनेत अर्ज करु शकतात असे नमूद करण्यात आलेले आहे.तसेच जास्त पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या साधारण बारा टक्य्यापर्यत योगदानाची परवानगी असते.

ज्यात कंपनीचाही हिस्सा असतो.ईपीएफओ च्या उच्च पेन्शन योजनेसाठी सुरुवातीला सन २०२३ला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयाने पेन्शनधारकांचे अर्ज स्विकारुन त्यांना ते प्राप्त झाल्याची पोहोचही दिलेली आहे.त्यानंतर २०२४ व २०२५च्या दरम्यान या उच्च पेन्शन योजनेसाठी ईपीएफओ कार्यालयाने आँनलाईन अर्ज ई.सेवा(सेतू)मार्फत भरण्यास सांगितले. त्यानंतर बहुसंख्य पेन्शनधारकांनी ई सेवा केंद्रातून आँनलाईन अर्ज भरले.

या कालावधीत ईपीएफओ आँनलाईन पोर्टलला तांत्रिक अडचणी येऊन ते वारंवार बंद पडत होते.त्यामुळे काही पेन्शनधारकाचे आँनलाईन अर्ज ईपीएफओ कडे प्राप्त झाले नाहीत असे ईपीएफओच्या कार्यालयातून सांगण्यात आले.ईपीएफओच्या उच्च पेन्शनसाठी सन २०२३साली पेन्शनधारकांनी प्रत्यक्ष ईपीएफओच्या कार्यालयात जाऊन जमा केलेले (आँफलाईन)संयुक्त दावा अर्ज (joint declaration form)ग्राह्य धरुन त्या पेन्शनधारकांना ईपीएफओच्या उच्च पेन्शन योजनेसाठी सामावून घेण्याचीअथवा या योजनेत समाविष्ठ होणार्‍या पेन्शनधारकांना ईपीएफओने आँनलाईन पोर्टल(uanपोर्टलवर)त्वरेने उपलब्ध करुन द्यावे अशी विंनती पेन्शनधारकानी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या आयुक्ताकडे केलेली आहे.पेन्शनधारकांसाठी हायर पेन्शन योजना ही सामाजिक सुरक्षा योजना असल्याने व पेन्शनधारकांच्या दैनदिन जीवनाशी निगडीत असल्याने त्याचा आग्रहपूर्वक निर्णय घेण्याची विंनती श्री मोहोळ व सौ सुळे यांच्याकडे पेन्शनधारकांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
93 %
0kmh
40 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!