इंदापूर -गणेश धनावडे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालय(कला, वाणिज्य व विज्ञान) कळंब ता. इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळातंर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे यांनी करून’निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेची रुपरेषा स्पष्ट केली.यावेळी डॉ.संगिता विनोद तोडकर यांनी ‘ Strong Body Strong Mind:Physical Health For College Girls’ विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी संतुलित आहार,विहार,व्यायाम,योग, विशेषतः हास्ययोग इ.माध्यमातुन आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज असून उत्तम आरोग्य हीच आपली सर्वोत्तम संपत्ती आहे असे सांगितले.तर पोलीस उपनिरीक्षक श्री. रतिलाल चौधर यांनी ‘Your Safety, Your Right: A Conversation with PSI’ या विषयावर मार्गदर्शन करताना संस्कृती, संस्कार यावर भर देवून मोबाईल विशेषतः सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करून आपणच आपली काळजी घेतली पाहिजे असे नमूद केले. कराटे प्रशिक्षक अनिल वाघेला यांनी कराटे प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थीनींचे मनोधैर्य वाढविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी विद्यार्थीनींनी आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.यावेळी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग ,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनाली चव्हाण यांनी केले तर प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


