35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमहाराष्ट्रमिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद


पुण्यात भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन
पुणे –
रेडिओ मिर्चीच्या सामाजिक उपक्रम “मिर्ची वेस्ट-हर्ता” ला मोठे यश मिळाले असून या उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी पुण्यात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण जनजागृतीसाठी राबविण्यात आला होता. समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ९ हजारहून अधिक नागरिकांनी सामाजिक स्वच्छतेची शपथ घेतली हेच या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल.
या गौरव सोहळ्याला
कोहिनूर ग्रुपचे एमडी व चेअरमन मा. श्री. कृष्णकुमार गोयल,

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम,

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त आणि खजिनदार
श्री. महेश सूर्यवंशी,

महा मेट्रो चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रवण हर्डीकर,

२०२५ च्या गणेशोत्सवाची धुरा सांभाळणारे पुणे शहर डिसीपी श्री. कृषीकेश रावळे
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची माहिती –
दिनांक: गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६
वेळ: दुपारी ३.०० ते ५.००
स्थळ: सुमंत मुळगांवकर सभागृह क्र.१ (ए विंग, ग्राउंड फ्लोअर)
MCCIA ट्रेड टॉवर, एस.बी. रोड, पुणे

या सोहळ्यात उपक्रमाचा प्रवास, यशोगाथा, सहभागींचा सत्कार करण्यात येणार आहे.
रेडिओ मिर्चीचा हा उपक्रम केवळ एक मोहीम नसून, समाजासाठी दिलेली एक सकारात्मक दिशा आहे.
“Radio With A Cause” या ब्रीदवाक्यानुसार मिर्चीने पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

-टीम 98.3 रेडिओ मिर्ची, पुणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments