36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानआरआर काबेलतर्फे काबेल स्टार सीझन 4 चे विजेते जाहीर

आरआर काबेलतर्फे काबेल स्टार सीझन 4 चे विजेते जाहीर


साजरा करत आहे 4 कोटी रु. च्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या चार वर्षांचा उत्सव
~ यावर्षी नागपूरमध्ये विक्रमी 47 सन्मानार्थी ~

नागपूर, -: भारतातील आघाडीची ग्राहक विद्युत उपकरणे तसेच वायर आणि केबल उत्पादक कंपनी आरआर काबेल यांनी नागपूर येथे काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम 2025 च्या विजेत्यांची अभिमानास्पद घोषणा केली. उद्योगक्षेत्रातील एक अग्रगण्य उपक्रम असलेला हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इलेक्ट्रीशियन्सच्या यावर्षी 10 वीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेल्या मुलांसाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे. शिक्षित आणि सक्षम भारत या आरआर काबेलच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 1 कोटी रु. हून अधिक निधी देऊन या होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन व पाठबळ दिले जाते. आतापर्यंत देशभरात जवळपास 4000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येकाला 10,000 रु. इतकी वैयक्तिक शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी केवळ आर्थिक आधार मिळाला आहे एवढेच नाही तर आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या दिशेने त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वात अर्जदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरातील जवळपास 1,000 विजेत्यांपैकी नागपूर शहराने विशेष ठसा उमटवला असून येथे 47 सन्मानार्थींचा समावेश आहे. या सर्वांचा नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन येथे आयोजित विशेष समारंभात सत्कार करण्यात आला.

2022 मध्ये सुरू करण्यात आलेला काबेल स्टार्स शिष्यवृत्ती कार्यक्रम ‘काबेल दोस्त’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलेक्ट्रीशियन्सच्या मुलांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला. सुरूवातीपासूनच या उपक्रमाचा देशभरातील पात्र विद्यार्थ्यांवर परिवर्तनकारी प्रभाव पडला असून त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. कालांतराने या कार्यक्रमाची व्याप्ती आणि महत्त्व दोन्ही वाढले असून, दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.

हे चौथे सत्र इलेक्ट्रीशियन समुदायाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आरआर काबेलची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ करत आहे. नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत आणि आर्थिक मर्यादा त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणार नाहीत हे सुनिश्चित करत या शिष्यवृत्तीमुळे मागील लाभार्थ्यांच्या असंख्य यशोगाथांना प्रेरणा मिळाली असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून आशादायक करिअरची सुरुवात केली आहे.

हा शिष्यवृत्ती कार्यक्रम म्हणजे आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती किर्ती काबरा यांच्या दृष्टीकोन आणि नेतृत्वाचे यश आहे. त्याबाबत आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “आरआर काबेलमध्ये आमचे काबेल दोस्त नेहमीच व्यवसायातील भागीदारांपेक्षा अधिक राहिले आहेत. ते आमच्या संपूर्ण प्रवासाचा पाया आहेत. काबेल स्टार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आम्ही केवळ आर्थिक मदत देत नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या आयुष्य बदलू शकतील अशा संधींचे दरवाजे उघडत आहोत. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुलाला ती पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी आणि कोणतेही स्वप्न परिस्थितीमुळे मर्यादित राहू नये याची खात्री करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. हे तरुण यशस्वी विद्यार्थी आत्मविश्वासाने आपल्या भविष्यातील वाटचाल करताना पाहणे हेच या उपक्रमाचे खरे फळ आहे.”

शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक पुरस्कार स्वीकारताना आनंद आणि अभिमानाने भारावून गेले होते. पालकांसाठी हा क्षण अनेक वर्षांच्या मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक होता. त्यांच्या मुलांनी निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याच्या महत्त्वाकांक्षांचा या समारंभात गौरव करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून आरआर काबेल या तरुण गुणवंतांना शिक्षणासाठी भक्कम पाया तयार करून देत आहे. त्यायोगे हे विद्यार्थी त्यांची पूर्ण क्षमता खुली करू शकतील.

काबेल स्टार्स शिष्यवृत्ती कार्यक्रम हा समाजाची परतफेड करण्याच्या आणि पुढील पिढीसाठी अधिक उज्ज्वल व सुशिक्षित भविष्य घडवण्याच्या दृष्टीने आरआर काबेलचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून उभा आहे. हे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात पुढे जात असताना इलेक्ट्रिशियन आणि त्यांच्या कुटुंबांच्या आकांक्षांना पाठबळ देणे आणि त्यांचा सन्मान करणे तसेच पुढील पिढीचे भविष्य घडवण्यात हातभार लावणे यासाठी आरआर काबेल कटिबद्ध आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments