35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमहाराष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त काव्यलेखन उपक्रम उत्साहात संपन्न

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त काव्यलेखन उपक्रम उत्साहात संपन्न

पुणे प्रतिनिधी –

आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त काव्यलेखन सहभाग उपक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम स्पर्धात्मक नसून केवळ सहभागात्मक स्वरूपाचा ठेवण्यात आला होता. समाजप्रबोधन, स्वच्छता, माणुसकी आणि समतेचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांच्या विचारांना शब्दरूप देण्यासाठी कवी, लेखक आणि कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात सहभागी झालेल्या कवितांमधून गाडगे महाराजांचे कार्य, समाजजागृतीचे ध्येय आणि परिवर्तनवादी विचार प्रभावीपणे मांडण्यात आले. चळवळीच्या मुख्य समन्वयकांच्या स्वाक्षरीने सन्मानित कवी कवयित्री आयुष्यमती रीता विवेकानंद रामटेके,आयुष्यमती ज्योती खोब्रागडे,आयुष्यमती सविता केदारे,आयुष्यमती सौ. सुरेखा श्याम ढोले,आयु. डॉ. अविनाश मनवर,आयु. कबीर शेख भारतीय,आयु. संघशिल भद्रे सर,कु. श्रेयस यादव,आयु. रामदास जाधव,आयु. रविचंद्र उत्तम गवळी,आयु. सुमेध चन्ने आयु. समाधान मस्के,आयु. संतोष अप्पासाहेब रायते इत्यादी कवींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

चळवळीच्या वतीने सांगण्यात आले की, “शब्दांतून विचार जिवंत ठेवणे आणि सांस्कृतिक माध्यमातून समाजजागृती करणे हेच या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट आहे.”या उपक्रमामुळे गाडगे महाराजांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साध्य झाले असून चळवळीला सांस्कृतिक बळ मिळाले आहे. असे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक म्हणाले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments