40.1 C
New Delhi
Monday, April 27, 2026
Homeक्रीड़ाडी. वाय. पाटील संघ अंतिम फेरीत

डी. वाय. पाटील संघ अंतिम फेरीत

विजेतेपदासाठी अनंतराव पवार कॉलेजविरुद्ध लढत; आर्की क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा

sport News | पुणे : गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एसएसएमएससीओए) यांच्या वतीने आयोजित विद्याश्री डेव्हलपर्स आर्की क्रिकेट अजिंक्यपद २.० स्पर्धेत एमआयटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर आठ गडी राखून मात केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. डी. वाय. पाटील संघाची विजेतेपदासाठी अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाशी लढत होईल. अनंतराव पवार कॉलेजने दुसऱ्या उपांत्य लढतीत सिम्बायोसिस कॉलेजवर मात केली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत डी. वाय. पाटील कॉलेजने एमआयटीला निर्धारित पाच षटकांत ८ बाद २२ धावांतच रोखले. एमआयटीचा निम्मा संघ आठ धावांतच माघारी परतला होता. डी. वाय. पाटील कॉलेजने विजयी लक्ष्य २.३ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले.

दुसऱ्या उपांत्य लढतीत अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने सिम्बायोसिस स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर आठ गडी राखून सहज मात केली. सिम्बायोसिसने दिलेले ६२ धावांचे लक्ष्य अनंतराव पवार कॉलेजने ४.१ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

श्री शिवाजी मराठा मुलींचा संघ अंतिम फेरीत
मुलींच्या गटाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शिवाजी मराठा आर्किटेक्चर संघाने एसकेएन संघावर आठ गडी राखून मात केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. एसकेएन संघाला निर्धारित ४ षटकांत ४ बाद १५ धावाच करता आल्या. शिवाजी मराठा आर्किटेक्चर संघाने विजयी लक्ष्य तीन षटकांत पूर्ण केले. संक्षिप्त धावफलक : एसकेएन – ४ षटकांत ४ बाद १५ (प्रतीक्षा बदक ५, श्रावणी कदम २-७, अनिष्का १-२) पराभूत वि. एसएसएमएस – ३ षटकांत १ बाद १६ (अनुक्शा गुप्ते नाबाद ६, संजना भरणकर ७).

संक्षिप्त धावफलक : एमआयटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ५ षटकांत ८ बाद २२ (पुष्कर ८, वेदान्त गिदये २-०-९-३, समीर जयपूरकर १-०-६-२, अथर्व मुरकुटे १-०-४-२, आदित्य दिकोंदवार १-०-३-१) पराभूत वि. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २.३ षटकांत २ बाद २३ (समीर जयपूरकर नाबाद ११, वेदान्त गिदये नाबाद ६, कैवल्य सुपेकर १-०-७-१). सामनावीर- वेदांत गिदये

सिम्बायोसिस स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ५ षटकांत ५ बाद ६१ (विराज जुमदे १८, वरुण पवार १०, गौरांग २-०-१४-२, गौरव कुंजिर १-०-१९-१, प्रज्वल १-०-९-१) पराभूत वि. अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ४.१ षटकांत २ बाद ६३ (गौरव कुंजिर नाबाद २८, प्रज्वल नाबाद १६, विराज जुमदे २-०-२५-२). सामनावीर -गौरव कुंजीर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
40.1 ° C
40.1 °
40.1 °
16 %
4.6kmh
0 %
Mon
44 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
40 °
Fri
39 °

Most Popular

Recent Comments