42.1 C
New Delhi
Monday, April 27, 2026
Homeमनोरंजन'बोल बोल राणी' १० जुलैला होणार प्रदर्शित

‘बोल बोल राणी’ १० जुलैला होणार प्रदर्शित

Marathi Cinema | सिड विंचुरकर निर्मित, दिग्दर्शित ‘बोल बोल राणी’ या bol bol rani चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून येत्या १० जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रहस्य आणि उत्सुकतेचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळतं. खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात, पार्श्वभूमीला घोंगावणारं रहस्यमयी संगीत आणि बंदुकीतून सुटलेली गोळी… या सगळ्यामुळे ‘नेमकं घडलंय तरी काय?’ असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे.

या व्हिडिओमुळे चित्रपटाच्या कथेबाबत कोणताही थेट उलगडा होत नसला, तरी त्यात दडलेली अस्वस्थ करणारी शांतता आणि थरारक वातावरण चित्रपट एका वेगळ्याच पातळीवर नेणार असल्याचं स्पष्ट होतं. विशेष म्हणजे पंधरा वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांच्यासोबत संभाजी ससाणेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नेमकी ही मुलगी कोण? तिचे हात का बांधलेले आहेत? गोळी कुणासाठी आहे? आणि या सगळ्यामागे कोणतं सत्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच चर्चेत रंगू लागले आहेत.

चित्रपटाबद्दल निर्माते, दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, ”थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. ‘बोल बोल राणी’चा हा व्हिडीओ या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावं.”

न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा सहनिर्माते असून तपन विचारे, यश राम शाहानी, आयुष कृप्लानी असोसिएट निर्माते आहेत. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. रहस्यमयी कथानक, तगडी स्टारकास्ट आणि वेगळ्या मांडणीमुळे Marathi movies ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.1 ° C
42.1 °
42.1 °
13 %
4.6kmh
2 %
Mon
43 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
40 °
Fri
39 °

Most Popular

Recent Comments