पुणे : मातोश्री येथे ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ या नव्याने नोंदणीकृत व्यंगचित्रकारांच्या संस्थेच्या लोगोचे आणि नोंदणी प्रमाणपत्राचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या संघटनात्मक वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांसाठी अधिकृत संस्था असावी आणि तिचे नाव ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’ असावे, अशी संकल्पना आपल्या काळात मांडली होती. त्याच विचाराला पुढे नेत महाराष्ट्रातील सुमारे ५० व्यंगचित्रकारांनी एकत्र येत देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य करून संस्थेची अधिकृत नोंदणी पूर्ण केली. संस्थेची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृतींशी जोडलेल्या मातोश्रीवरून व्हावी, असा निर्णय घेण्यात आला.
संस्थेचे प्रतिनिधी धनराज गरड आणि गौरव सर्जेराव यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. या वेळी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती, छायाचित्रे आणि भविष्यातील योजना सादर करण्यातऊ आल्या. उद्धव ठाकरे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत व्यंगचित्रकलेच्या सामाजिक प्रभावावर मार्गदर्शन केले.
या भेटीत दादर येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे नवोदित व्यंगचित्रकारांसाठी कार्यशाळा दालन, पुण्यात व्यंगचित्रकार भवन, तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांना पद्म पुरस्कारासाठी प्रयत्न अशा मागण्या मांडण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांनी स्मारकात संस्थेला कार्यशाळांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अमित पापळ, उदय मोहिते आणि ओमकार बागवे उपस्थित होते.
मातोश्रीवर ‘कार्टूनिस्ट्स कंबाईन’च्या लोगोचे अनावरण
व्यंगचित्रकारांसाठी कायमस्वरूपी जागेचे आश्वासन
New Delhi
clear sky
32.1
°
C
32.1
°
32.1
°
45 %
3.9kmh
0 %
Fri
32
°
Sat
42
°
Sun
42
°
Mon
39
°
Tue
40
°


